ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

आंबेडकरी जाणिवा ठळकपणे मांडण्याची गरज

April 13, 202113:45 PM 132 0 0

जे डिमेटर म्हणून आमच्या आयुष्यात आले आणि आमच्या भणंग आयुष्यांना ज्यांनी अत्तसूर्य करून टाकलं ते ह्या भूमीवरील दुसरे आधुनीक बुध्द ,क्रांतीमानव, युगनायक प.पू.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची 130 वी महाजयंती आपन सध्या कोरोना ह्या जागतीक महामारीने थैमान घातल्याच्या काळात साजरी करीत आहोत,आर्थीक व्यवस्थेचं कंबरडे मोडले असतानाच्या या काळात आणि बेरोजगारीची भीषण समस्या निर्माण झाल्याच्या या काळात आंबेडकरी समूहासमोर पुन्हा नव्याने ऊभं राहण्याचे आव्हान आहे.या जयंतीच्या निमीत्ताने आपन जशी दरवर्षी वाजत गाजत जयंती साजरी करतो ,त्याला यावर्षी प्रशासनाने लावलेल्या कोरोनासंबंधी निर्देशाने काही प्रमाणात बंधने येणार आहेत.तेव्हा यानिमीत्ताने आता आपन अधिक प्रगल्भ होऊन आपल्यात रूजून आणि रूतून असलेल्या आंबेडकरी जाणीवा आधिक ठळकपने मांडण्याची गरज आहे ,असं मला यानिमीत्ताने वाटतं.

रिपब्लिकन राज्यसमाजवादाचं जबरदस्त महास्वप्न बाऴगणार्या आंबेडकरी समूहाने आता गतिप्रवण झालं पाहीजे, त्यासाठी आपल्यातल्या आंबेडकरी जाणिवांची नव्यानव्याने ऊजळणी ह्या जयंतीच्या निमीत्ताने करावी, असं मला वाटतं. ह्या जाणिवा माणसाला सर्वकष विषमतेच्या विरोधात चेतवितात.जुलुमांविरूद्ध लढण्यासाठी दहा हत्तीचं बळ देतात.माणसाने माणसांना वंदन करण्यासाठी समतेच्या नवपर्वाची ऊभारनी करतात. समता,न्याय,बंधुता,स्वातंञ्य,लोकशाही, संविधान ह्या जीवनमुल्यांच्या सामाजीक अंमलीकरणाचा आग्रह धरून समतावादी समाज निर्मान व्हावा अशी अपेक्षा ठेवतात.आर्थिक समानता आल्याशिवाय सामाजिक विकास नाही..ही भुमिका मांडुन रोजच्या रोजी-साठी लढणार्या रस्त्यांवरच्या माणसांच्या मनात क्रांतीवनवा पेटवितात…महीलांच्या प्रगतीवरून समाजाच्या प्रगतीचे मोजमाप करतात…ह्या जानीवा जातीअंताची आरोळी ठोकुन प्रबुध्द भारताची मांडनी करतात…आंबेडकरी जानीवा ह्या माणसाला प्रकाशाचा (बुध्दाचा) ऊजेडाचा,मार्ग दाखवुन प्रकाशित करतात…ह्या जानीवा आंबेडकरी समूहाला नेहमीच आकर्षिेत करीत आल्या आहेत…रोमारोमात भरल्या आहेत..श्वासाश्वासात वाहत आहेत…आजुबाजुच्या विषमतेने ग्रस्त असलेल्या मानवी जीवनाला आंबेडकरी जानीवांचा,क्रांतीदर्शीे,शाश्वत, विचार हाच तरारून नेईल…आंबेडकरी विचार हा सगळ्यां समष्टीचा, विचार आहे…आंबेडकरी जानीवा ह्या माणसाला समृद्ध जीवनाच्या दिशेने मार्गक्रमन करण्याची ग्वाही देतात….मी याद करतो आहे डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्या क्रांती-समतानायकाला की ज्यांच्यामुळे अमानुषताग्रस्त जीवनांच चंदन झालं….माणसांनी माणसांना वंदन करणारं नवजीवन निर्मित झालं…

माणसांनी माणसांशी माणसांप्रमाणे वागलं पाहीजे..अशा सोप्या शब्दांत क्रांतीअंगार चेतविणार्या दिपस्तंभ डॉ. बाबासाहेबांना या 130 व्या महाजयंतीच्या निमीत्ताने मी क्रांतीकारी अभिवादन करीत आहे आणि जगभरातील तमाम माणसांना जयंतीच्या सहर्ष सदिच्छा देतो. जयभीम जयभारत.

– आयु. साऊल झोटे
शिलॉग (मेघालय)
mo. 8329280166

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *