ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

नव्या पिढीने वाजेकर शेठ यांच्या कार्याची प्रेरणा घ्यावी- आमदार बाळाराम पाटील

February 16, 202214:54 PM 29 0 0

उरण ( संगीता पवार ) : सहकार चळवळ,कामगार संघटना ,शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची जाणीव, आगरी समाजाचे संघटन, स्वधर्माबद्दल प्रेम आणि विविध चळवळीद्वारे समाजप्रबोधन करून वाजेकर शेठ यांनी समाजात आगळे-वेगळे स्थान निर्माण केले आहे.त्यांचे कार्य या पुढील पिढीसाठी ही प्रेरणादायी असेल असे प्रतिपादन आमदार बाळाराम पाटील यांनी केले. तसेच ह्या परिसरातील विकासाचे वाटेकरी आपणास व्हायचे असेल तर आपल्याला दर्जेदार आवश्यक शिक्षण उपलब्ध करावे लागेल व त्यासाठी परिसरातील सर्व स्तरातील मान्यवरांनी मतभेद विसरून एकत्र यावे लागेल व आपण गुणवत्ता धारक नवीन पिढी घडवूया असे विचार मांडले. रायत शिक्षण संस्थेचे तु.ह. वाजेकर विद्यालय आणि कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय फुंडे यांच्या संयुक्त विद्यमानेमंगळवार ( दि. १५ ) रोजी आयोजित वाजेकर पुण्यतिथी आणि वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचेआयोजित प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर मा.कृष्णा कडू चेअरमन फुंडे हायस्कूल, , सुधीर घरत जनरल बॉडी सदस्य रयत शिक्षण संस्था सातारा मोहन पाटील प्राचार्य तु ह वाजेकर विद्यालय फुंडे उपस्थित होते. प्राचार्य डॉ.पी जी पवार यांनी प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत केले. सुधीर घरत, जनार्दन शेठ भोईर, संतोष पवार आणि कृष्णा कडू यानी आपले विचार व्यक्त केले. कार्याध्यक्ष डॉ.राहुल पाटील यांनी अहवाल वाचन केले
मान्यवरांच्या शुभहस्ते गुणवंत प्राध्यापक आणि विद्यार्थी यांचे पारितोषिक वितरण संपन्न झाले.जिमखाना प्रमुख डॉ.विलास महाले यांनी क्रीडा विभागाचे अहवाल वाचन केले.सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.सुजाता पाटील यांनी सांस्कृतिक विभाग अहवाल वाचन केले. प्रा.यू. टी.घोरपडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला सर्व शिक्षक-शिक्षकेतर रयत सेवक,महालन विभागातील सर्व ग्रामस्थ,पत्रकार, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते. डॉ. विद्या नावडकर डॉ.सुजाता पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *