ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसीना आरक्षण मिळेपर्यंत पुढील निवडणुक होऊ देणार नाही- भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अशोक अण्णा पांगारकर

October 26, 202114:22 PM 15 0 0

जालना (प्रतिनिधी):- महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या आगामी जिल्हा परषिद व पंचायत समिती, महानगरपालीका व नगर परिषद निवडणुकीत ओबीसी प्रवर्गास राजकीय आरक्षण मिळणार नाही तो पर्यंत यापुढील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ देणार नसल्यांचा ईशारा भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अशोक अण्णा पांगारकर यांनी जालना येथे ओबीसी जागर यात्रेनिमित्त जालना येथे राज्यातील महाविकास आघाडी सरकारला दिला आहे.

भाजपा ओबीसी मोर्चा च्या वतीने महाराष्ट्रभर ओबीसी जागर अभियान सुर असून या ओबीसी जागर यात्रेचे आगमन जालना येथे स्वागत करण्यात आले असता भाजपा ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष अशोक अण्णा पांगारकर म्हणाले की, भाजपा हा ओबीसीना आरक्षण मिळणार नाही तो पर्यंत भाजपा शांत बसणार नसून महाराष्ट्रामध्ये ओबीसी जागर रथ यात्रा संपुर्ण महाराष्ट्रामध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,केंद्रीय राज्यमंत्री ना.रावसाहेब पाटील दानवे,प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, माजीमंत्री पंकजाताई मुंडे,केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड, ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष योगेश अण्णा टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली यात्रा निघाली असून ओबीसीच्या संरक्षणार्थ व ओबीसींना न्याय मिळवून देण्यासाठी भाजपा कटीबध्द असून ओबीसी समाजावर राज्यातील काँग्रेस व राष्ट्रवादी-शिवसेना महाविकास आघाडी सरकारने अन्याय केला असून महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसीचे आरक्षण रद्य झाले असून जो पर्यंत महाविकास आघाडी सरकार ओबीसींना राजकीय आरक्षण देणार नाही तो पर्यंत आम्ही यापुढेही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ देणाार नसल्याचा ईशारा ही ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अशोक अण्णा पांगारकर यांनी दिला आहे.
यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस सिध्दीविनायक मुळे, युवा नेते प्रतीक भैय्या दानवे पाटील, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष कपील दहेकर,भाजपा जिल्हाप्रसिध्दी बाबासाहेब पाटील कोलते, जिल्हा उपाध्यक्ष सतिष जाधव, ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सुभाष मामा सले, नवनाथ पाटील जोगदंड, ओबीसी युवक जिल्हाध्यक्ष रोहीत नलावडे,नगरसेवक सुनिल पवार,बाबुराव भवर,सोमेश काबलिये,सचिन जाधव,विठ्ठल नरवडे,बाळासाहेब देशमुख आदीची प्रमुख उपस्थीती होती.
जालना शहरातून ओबीसी जागर यात्रा संभाजीनगर लक्कडकोट,गांधीचमन,मस्तगड,शिवाजीपुतळा,मामाचौक,कन्हैय्यानगर मार्गे टेंभुर्णी व जाफ्राबादकडे रवाना झाली.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *