ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

पालातला भटका माणूस संविधानामुळे महालात आला – गोविंद बामणे

February 9, 202114:22 PM 139 0 0

नांदेड – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यभरातील अथक प्रयत्नांनी आज माझ्यासारखा पालातला माणूस महालात आला. ही किमया केवळ भारतीय संविधानामुळेच साधली गेली आहे. भारतीय संविधानाबद्दल प्रत्येक भारतीयांनी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे अशा भावना येथील विद्रोही कवी भटक्यांचे फटकेकार गोविंद बामणे यांनी व्यक्त केल्या. मातोश्री रमाबाई आंबेडकर जयंतीनिमित्त सप्तरंगी साहित्य मंडळ व महाराष्ट्रातील नामवंत विद्रोही कवींचे कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते. कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी युवा विद्रोही कवी भटक्यांचे फटकेकार गोविंद बामणे हे होते. उद्घाटक म्हणून कवी डॉ. सय्यद अकबर लाला, स्वागताध्यक्ष गंगाधर ढवळे, अतिथी कवी म्हणून अनुरत्न वाघमारे, कवी मारोती कदम, परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मुकुंदराज पाटील, प्रा. माधव जाधव, सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा नरवाडे‌ आदींची उपस्थिती होती. राज्यभरातून सहभागी झालेल्या विद्रोही कविंनी गुलाबी थंडीत जणू विद्रोही कवितांचा काव्य अंगार फुलविला.

महात्मा कबीर समता परिषदेच्या वतीने शहरातील कै. डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात महाराष्ट्र भूषण, नांदेड भूषण, जीवनगौरव तसेच कोरोना सेवा गौरव पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यापूर्वी परिषदेकडून सप्तरंगी साहित्य मंडळ व राज्यातील विद्रोही कविंना पाचारण करण्यात आले होते. महात्मा कबीर आणि माता रमाईच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कविसंमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. यात उद्घाटक सय्यद अकबर लाला आणि अध्यक्ष गोविंद बामणे यांच्यासह प्रतिभा थेटे, ज्ञानेश्वरी गुळेवाड, स्वाती मुंगल, मीनाक्षी कांबळे, उषाताई ठाकूर, बालिका बरगळ, राजेश गायकवाड, आ.ग. ढवळे, सूनिल नरवाडे, नाना वाठोरे, विठ्ठलकाका जोंधळे, शरदचंद्र हयातनगरकर, नागोराव डोंगरे, राम गायकवाड, गंगाधर ढवळे, नागोराव डोंगरे, अनुरत्न वाघमारे, रणजीत कांबळे, जाफर शेख, भगवान वाघमारे, संदीप गोणारकर, श्याम नौबते, अशोक भुरे, अॅड. संजय भारदे आदी कवी कवयित्रींनी सहभाग नोंदवला.
कविसंमेलनाचे प्रास्ताविक गंगाधर ढवळे यांनी केले. सूत्रसंचालन अनुरत्न वाघमारे यांनी केले तर आभार नागोराव डोंगरे यांनी मानले. कविता सादरीकरणानंतर लगेच स्वागत समितीच्या वतीने सर्व सहभागी कवींचा गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. कुलदीप पाटील, डॉ. आनंद भालेराव, विशालराज वाघमारे, हरीभाऊ भवरे, डी. एन. कांबळे, आ. ग. ढवळे,जी. एस. ढवळे, एन. व्ही. डोंगरे, बी. जी. वाघमारे, भीमराव घुले, दत्ता गंडलवार आदींनी परिश्रम घेतले. कविसंमेलनानंतर सांस्कृतिक कार्यक्रम आणि पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.

माता रमाईचा त्याग अलौकिक होता – मारोती कदम
माता रमाईच्या आयुष्याला तिच्या जगण्याला जळण्याची झालर होती. बाबासाहेब आणि रमाईच्या पोटी हललेला हरेक पाळणा सुना झालेला होता. परंतु या सूर्याने आणि त्याच्या सावलीने आमच्या सारख्या नवकोटी सूर्यपुत्रांना जन्माला घातले. रमाईचा त्याग अलौकिक आणि आजच्या स्त्रियांनी आदर्श घ्यावा असाच होता, असे प्रतिपादन अतिथी कवी व स्तंभलेखक मारोती कदम यांनी केले. ते म्हणाले की, रमाईचा विद्रोह दारिद्र्याच्या आणि व्यवस्थेच्या जळत्या प्रश्नांच्या विरुद्ध होता. आजही उपेक्षितांचा विद्रोह सुरुच आहे. कदम यांनी त्यांच्या कवितेतून लोकशाही की ठोकशाही यावरही परखड भाष्य केले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *