ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

श्री गणेश महासंघाचे कार्यालयाचे उद्‌घाटन आ.बबनराव लोणीकर यांच्या हस्ते संपन्न

September 13, 202113:25 PM 45 0 0

जालना-प्रतिनिधी जालना श्री गणेश महासंघाचे मुख्य कार्यालयाचे उद्‌घाटन स्व. रुपा पहेलवान खरे कॉम्लेक्स, जुना खवा मार्केट जालना येथे माजी कॅबिनेट मंत्री व आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी आ.बबनराव लोणीकर यांच्या फेटा, शाल व श्रीफळ देऊन पुष्पहाराने श्री गणेश महासंघाचे अध्यक्ष कपील गजबी यांनी केले. यावेळी प्रमुख उपस्थिती असलेले आमदार कैलास गोरंट्‌याल यांचा सत्कार श्री गणेश महासंघाचे कार्याध्यक्ष विशाल पल्लोड यांनी केले. तसेच माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचे सत्कार श्री गणेश महासंघाचे महासचिव मनिष (बाबा)नंद यांनी शाल, श्रीफ व फेटाबादून केले. जालना मर्चंट बॅंकेचे चेअरमन अंकुशराव राऊत यांचा सत्कार कोषाध्यक्ष गजेंद्र बागडी यांनी केले. कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक अनिल सोनी यांचा सत्कार उपाध्यक्ष रवि भक्कड तसेच शिवसेनेच जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांचे सत्कार बालाजी अडीया यांनी केले, शिवसेना पंडित भुतेकर यांचे सत्कार विजय खताडे यांनी केले. मुख्य मार्गदर्शन प्रा.आयेशा खान मुलानी यांचा सत्कार पारसनंद यांनी केले.

आमदार लोणीकर यांनी श्री गणेश महासंघाचे कार्य अंत्यत उल्लेखनीय व रचनात्मक असून गेल्या 35 वर्षापासून तरुणांना सामाजिक दिशा देण्याचे व लोकमान्य टिळक यांची परंपरा जोपासण्याचे काम व हिंदुवादी विचार श्री गणेश महासंघ करीत आहे. तसेच श्री गणेशोत्सवात शांततेत पार पडण्यासाठी सर्व गणेश मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी यांना सोबत घेऊन जनता व पोलीस यांच्याशी समन्वयेक भूमी घेऊन महोत्सव साजरे करतात. श्री गणेश मंडळाची कोणतीही अडीअडचण सोडविण्याचे काम ही श्री गणेश महासंघ करीत असल्याचा दावा प्रा.आयेशा खान मुलानी यांनी केला. यावेळी आमदार कैलास गोरंट्‌याल यांनी श्री गणेशाला विघ्न हरणाचे विनंती केली व श्री गणेश महासंघाला शुभेच्छा दिली.
यावेळी नगरसेवक विष्णु पाचफुले, प्रशांत वाढेकर, अर्जुन गेही, बद्रीसेठ सोनी, राजेश पंजाबी, बंकट खंडेवाल, कमेलश खरे, रोषण चौधरी, ऍड.नरेंद्र पोखरकर, दिनेश भगत, रतीलाल भगत, अविनाश कव्हळे, रवि अग्रवाल, सुनिल आर्दड व अहिर गवळी समाज सामुहिक विवाह मुख्य समितीचे अध्यक्ष तुळशीरामजी विजयसैनानी, ब्रम्हानंद जांगडे, मदन भुरेवाल, लक्ष्मण पहेलवान सुपारकर, विरेंद्र धोका, संतोष आर्य, संजय खरे, तुकाराम मिसाळ, मनिष तवरावाला, सागर बजाज, बद्री भुरेवाल, अक्षय पवार, नारायण भगत, गौर बोरा, राहुल भकत, प्रदीप गिरी, संदीप पवार, किशोर जैन, विक्की अलीझार, पंकज खरे, प्रविण भगत, बद्री उपरे, आशीष राठोड, घोडे पाटील, नागे पाटील, शिवराज नारियलवाले, सोमेश काबलीये, अरविंद देशमुख, अमर झाडहीवाले, राजेंद्र गोरे पाटील, अविनाश कवळे पाटील व इतर सर्व गणेश भक्त असंख्येने उपस्थित होते. कोरोनाचे नियम व शासनाचे नियमांचे कठोर पालन करावे असे आवाहन महासचिव मनिष नंद यांनी केले व शांतते गणेश महोत्सव पार पाडावे अशी विनंतीही गणेश भक्तांना करण्यात आली आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *