ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

महसुल विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शासनाच्या योजना तळागाळापर्यंत प्रभावीपणे पोहोचवाव्यात – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

August 3, 202212:43 PM 18 0 0

जालना  : महसुल विभाग हा प्रशासनाचा कणा समजला जातो. महसुल विभागात काम करत असताना प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जनतेचा विश्वास संपादन करुन शासनाच्या योजना तळागाळापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले. महसुल दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉ. राठोड बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र परळीकर, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन), जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती रिना बसेय्यै, उपजिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, श्रीमती अंजली कानडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी ज्ञानोबा बानापुरे, तहसिलदार विद्याचरण कडवकर,महसुल कर्मचारी संघटेनेचे सर्वश्री गणेश कावळे, विश्वास मोरे, श्री हंडे, श्रीमती छाया कुलकर्णी,पांडूरंग गिरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
महसूल दिन हा केलेल्या कामाचा उत्सवोत्सव तसेच जबाबदारीचे भान करुन देणारा दिवस असल्याचे सांगत जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड म्हणाले, ब्रिटीश काळापासून सुरु झालेला हा महसुल विभाग आहे. ब्रिटीश काळामध्ये केवळ महसुल जमा करणारा हा विभाग होता. परंतू महसुल विभागाच्या कामाचा व्याप मोठ्या प्रमाणात वाढला असुन केवळ महसुल जमा करणेच नव्हे तर शासनाच्या अनेकविध योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी महसुल विभागावर सोपविण्यात आलेली आहे. प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यांने पदापेक्षा प्रामाणिकतेला महत्व देत सेवाभाव वृत्तीने काम करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. गत दोन वर्षात कोव्हीडचे मोठे आव्हान प्रशासनासमोर होते. या परिस्थितीमध्ये आरोग्य विभागाबरोबर महसुल विभागाने अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडली. कोव्हीड रुग्णालयाची उभारणी, विलगीकरण कक्ष, ऑक्सिजनचा पुरवठा यासह इतर आवश्यक त्या सर्व सुविधा सर्वसामान्यांना पुरविण्यामध्ये महसुल विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कुठल्याही प्रकारची कमतरता भासू न देता देवदूत म्हणून काम केले असल्याचेही जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी यावेळी सांगितले. शासनाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अधिक चांगल्या पद्धतीने काम करण्याची जशी शासनाची अपेक्षा असते तशाच कर्मचाऱ्यांच्याही शासनाकडून, प्रशासनाकडून अपेक्षा असतात. आपले संपूर्ण आयुष्य सर्वसामान्यांची सेवा करण्यामध्ये व्यतीत करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या समस्या, अडचणी सोडविण्यासाठीही आपण सातत्याने प्रयत्नशिल असल्याचेही डॉ. राठोड यांनी यावेळी सांगितले.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे म्हणाले, महसुल व पोलीस प्रशासन ही रथाची दोन चाके आहेत. महसुल व पोलीस विभागातील प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी एकत्रित व समन्वयाने काम करत जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी तसेच जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करत पुरस्कारप्राप्त सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल म्हणाले की, कोव्हीड काळामध्ये आरोग्य विभाग, महसुल, पोलीस, जिल्हा परिषदेमधील अधिकारी,कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे मोठ्या संकटाचा सामना करण्यात यश प्राप्त झाले. प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्याने सेवाभाववृत्तीने समाजातील नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवुन देण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन काम करण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके म्हणाले की, गत दोन वर्षामध्ये जिल्ह्यात १०० टक्के महसुलाची वसुली करण्यात आली आहे. जालना जिल्हा प्रत्येक विकासात्मक बाबीमध्ये विभागामध्ये अग्रेसर रहावा यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात येत असुन जिल्ह्यातील शासकीय जमीनीचे गुगलअर्थ या संगणकीय प्रणालीसोबत मॅपींग करण्याचा उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. जवळपास 90 टक्के काम पुर्ण करण्यात आले असुन हा उपक्रम राज्यस्तरावर राबविण्याचा शासनाचा विचार सुरु आहे. कोव्हीड काळामध्ये मृत पावलेल्यांच्या कुटूंबियांना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचे शासनाने निर्देश दिल्याने जिल्ह्यात 1 हजार 369 वारसांना मदत देण्यात आली आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात समाधान शिबीरांचे आयोजन करत नागरिकांना मोठ्या प्रमाणात सोयी-सवलती उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. महसुल विभागाच्यावतीने करण्यात येणाऱ्या कामांना येणाऱ्या काळात अधिक प्रमाणात गती देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल खालील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
अधिकारी संवर्गामध्ये अपरजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, उपजिल्हाधिकारी पुनर्वसन अंजली कानडे, तहसिलदार घनसावंगी नरेंद्र देशमुख, नायब तहसिलदार विक्रांत मोंढे.
लघुटंकलेखक संवर्ग- संतोषी सुर्यवंशी,
अवल कारकुन संवर्ग – वैशाली तोटे, संदिप डोंगरे, संगिता वाघ, प्रल्हाद दवणे, गणेश सपकाळ
मंडळ अधिकारी संवर्ग – गंगाधर मगरे, सुधाकर साळवे, संजय दिघे, शिवाजी गारोळे
महसुल सहायक संवर्ग – सविता भोकरे, रघुनाथ धामणे, गजानन महानुर, श्रीरामप्रसाद वाघ, स्वप्नील देवकते,
तलाठी संवर्ग – दुर्गेश गिरी, विजय बुचुडे, किशोर वावरे, राम धनेश,
वाहन चालक संवर्ग – महादेव बाबुराव सुपेकर
शिपाई संवर्ग – छाया कुलकर्णी, दौलत राजगिरे, जीवन म्हस्के, ज्ञानेश्वर ढवळे, यशोराज कांबळे,
कोतवाल संवर्ग – अमोल पोपळघट, गजानन जाधव, ज्ञानेश्वर बारहाते, राहुल ताडे.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संपदा गणेश कुलकर्णी यांनी केले तर आभार नायब तहसिलदार संतोष अनर्थे यांनी मानले.
कार्यक्रमास महसुल विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *