जालना (प्रतिनिधी) ः करोना महामारी आणि लॉकडाउन कालावधीत गोरगरीब व गरजुंना मदत करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असतांना या संकटाकाळात बिळात लपुन बसलेले आणि स्वतःसह पक्षाचे कोणतेही अस्तीत्व नसलेले एमआएमचे जिल्हाध्यक्ष शेख माजेद आता जालना नगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर चुळबूळ करुन लागले आहेत असा टोला कॉग्रेसचे नगरसेवक शेख शकील यांनी लगावला आहे.
या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात शकील यांनी म्हटले आहे. की, मागील वर्षी करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर केंद्र आणि राज्य शासनाने संपुर्ण लॉकडाउनचे आदेश दिले होते. त्यामुळे रोजगार बुडाल्याने गोर गरीबांच्या अन्नपाण्याचा प्रश्न गंभीर झाला होता. कारखानदारी आणि विविध छोटे- मोठे व्यवसाय बंद पडल्याने हजारो परप्रांतीय कामगार आपापल्या राज्यात पायी परतत असतांना पोटात अन्न नाही, पाण्याची सोय नाही, पायात पादत्राने नाही असे विदारक चित्र निदर्शनास आल्यानंतर जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी आई आणि दोन भावांच्या झालेल्या निधनाचे दुःख बाजुला सारत गोर गरीब कुटूंबासह शहरातील मंगळबाजार भागात
मातोश्री स्व. भुदेवी किसनराव गोरंट्याल प्रतिष्ठाणच्या वतीने अन्नछत करुन करुन अन्नछत्राच्या माध्यातुन सलग दोन महिने सकाळ, संध्याकाळ गरजु कुटूंबियांसह रस्ताने पायी जाणाऱ्या परप्रांतीय कामगारांना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नगर सेवकांच्या माध्यामातुन अन्नाचे पाकीट वाटप करुन त्यांची भुक भागवण्याच्या प्रामाणिक प्रयत्न केला. एवढचे नव्हे तर शहरातील गरीब कुटूबांना स्वखर्चातुन 10 किलो गहु, 5 किलो तांदुळ आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करून ऐन संकट काळात आधार देण्याचा प्रयत्न केला.
गेल्या दोन महिन्यांपासून करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने करोना बाधित रुग्णांच्या नातेवाईकांना निर्माण होत असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या नेतृत्वाखाली जालना शहर काँग्रेस कमिटीतर्फे मदत केंद्र सुरू करण्यात आले असून जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात करोना रुग्णांच्या नातेवाईकांसाठी निवारा केद्रासह अन्नदानाचा उपक्रम देखील सुरू करण्यात आला आहे. आ. कैलास गोरंट्याल यांनी करोना महामारी आणि लॉकडाऊन कालावधीत केलेल्या अतुलनीय कार्याची जालना शहरासह जिल्हाभरात जिल्हाभरातील नागरिकांमधून आजही प्रशंसा होत असतांना स्वतःचे आणि पक्षाचे कोणतेही अस्तित्व नसलेले एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शेख माजेद हे आता बिळातुन बाहेर पडले आहे. करोना महामारी आणि लॉकडाऊन काळात गरजू लोकांना मदत करण्याएैवजी बिळात खुपसुन बसलेले शेख माजेद आता नगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर चुलबुल करण्यासाठी बिळातून बाहेर पडले आहेत. एमआयएम या पक्षाची भूमिका सर्वांच्या विशेषता मुस्लिम समाजाच्या लक्षात आली असल्याने अशा पक्षाला आणि बिनबुडाचे आरोप करणाऱ्या नेत्यांना कोणी थारा देणार नाही असा विश्वास नगरसेवक शेख शकील यांनी व्यक्त केला आहे.
Leave a Reply