भोकर (प्रतिनिधी) तालुक्यातील हौशी कलावंतांनी एकसंघ होऊन सेवनस्टार प्रोडक्शन भोकर निर्मित “हक्कदार” लघु” चित्रपट (शाटफिल्म) तयार केला आहे.या चित्रपटाचा शूभारंभ शूक्रवारी (ता ३०) सिने कलावंत रामेश्वर भालेराव ( ज्युनिअर ज्यांनी लीव्हर) यांच्याहस्ते करण्यात येणार असून अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.अशी माहिती सिध्दार्थ कांबळे यांनी दिली आहे.
शहरातील बिलालनगर येथील “संगम” फंक्शन हाल मध्ये सकाळी दहा वाजता होणाऱ्या कार्यक्रमास हास्यसम्राट शाहीर रमेश गीरी, उपविभागीय पोलिस अधिकारी गोपाळ राजंनकर, पोलीस निरीक्षक विकास पाटील, सभापती जगदीश पाटील भोसीकर,कीशोर पाटील लगळूदकर, विश्वंभर पवार,अमोल पवार, सुनील कांबळे, भीमराव दूधारे,पी.एम.तोडे,प्रा.व्यंकट माने,पत्रकार बी आर.पांचाळ,मनोजसिंह चौव्हाण, साहेबराव मोरे,सौ.विजयाताई घिसेवाड अॅड.कूंठे, याची उपस्थिती राहणार आहे.चित्रपटातील प्रमुख कलाकार धिरज कांबळे, सुरेश कावळे,श्रध्दा कांबळे,स्वाती गजभारे,निता बरकंबे, निखील कावळे,दत्ता गंगासागरे,व्ही.की.वाघमारे,कुसुमबाई सोनकांबळे, जयभीम पाटील,राजू दांडगे, बिंबिसार पाटील,वैभव व्यवहारे,प्रशांत डोंगरे,पवन मोरे, राहुल हनवते,अंकीता डोंगरे,वनमाला पारडकर,सायली मोरे,प्रांजली पवार, अस्मिता कांबळे यांचा सहभाग असून सिध्दार्थ कांबळे ( लेखक,दिग्दर्शक), अस्मिता कांबळे (सहदिग्दर्शक),सूरज कांबळे (संगीत),बूध्दशासन पाटील ऊर्फ अक्षय(संकलक),विक्की.वाघमारे, बूध्दशासन पाटील,सोनू नवरे(चित्रीकरण) सौ.सरस्वती कांबळे (निर्मिती)यांनी बाजू सांभाळली आहे.
Leave a Reply