खुदी को कर बुलंद ईतना की खुदा खुद बंदे से पुछे कीं बता तेरी रजा क्या है समान्यातून असामान्य कार्य करण्याची ताकत ज्याच्या मनगटात आहे त्याच्या कर्तुत्वाची दखल सारी दुनिया घेत असते !…..आणि अश्याच एका अलौकिक आणि अचंभित करणाऱ्या कर्तुत्वाची गाथा ज्याने आपल्या कुशाग्र बुद्धिमत्ता आणि अफाट परिश्रमच्या जोरावर लिहिली !…असा संपूर्ण रायगड वासीयांसाठी आणि खास करून आगरी समाज्याचा ऊर अभिमानानं भरून यावा असा भीम पराक्रम करणारा .. भीमपराक्रमी……मुळचा अलिबाग …तालुक्यातील… शाहाबाद चौकीचा पाडा … आणि सध्या… कर्जत …येथे वास्तव्यास असणारे …कर्जत तालुक्यातील …जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोल्हारे.. शाळेचे मुख्याध्यापक … श्री चंद्रशेखर जुईकर यांचे सुपुत्र …आणि साऱ्या रायगड वासीयांची शान आणि… आगरी समाज्याचा अभिमान ….प्रतिक चंद्रशेखर जुईकर…यांनी देशातील सर्वात महत्वाची समजली जाणारी यु.पी.एस.सी.च्या परीक्षेत उत्तुंग यश मिळवत १७७ वा क्रमांक मिळवून …रायगड जिल्ह्यातील पहिला यु.पी.एस.सी.परीक्षा विजेता ठरत …थेट … आय.ए.एस. झालेला रायगड जिल्ह्यातील …पहिला … आगरी मुलगा…. आय.ए.एस.अधिकारी म्हणून … प्रतिक जुईकर यांची नोंद झाली आहे.
ह्याच अतुलनीय आणि अभिमानास्पद कार्याची दखल घेत …केअर ऑफ़ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक … सन्माननीय श्री राजू मुंबईकर साहेब…आणि …आदर्श शिक्षक पुरस्कार.. प्राप्त उपक्रमशील शिक्षक …श्रीमंत … कौशिक जी ठाकूर सर सोबतच … श्री अनिल घरत (उरण तालुका सचिव – आगरी,कोळी,कराडी संघर्ष सा.संस्था महाराष्ट्र )…यांनी ह्या भीमपराक्रमी …व्यक्तिमत्वाला भेटून त्यांना शाल, पुष्पगुच्छ आणि … साई सन्मानचिन्ह देऊन त्यांच अभिनंदन केलं !… त्याच सोबत …साई देवस्थान साई मंदिर वहाळचे संस्थापक अध्यक्ष …सन्माननीय …श्री रविशेठ दादा पाटील साहेब यांनी सुद्धा त्याच वेळेला राजू मुंबईकर साहेबांच्या मोबाईल फोन वर कॉल करून प्रत्यक्ष फोन वरून त्यांच्या सोबत संभाषण करून त्यांचं अभिनंदन केले.
ह्या रायगडच्या … कोहिनूर हिऱ्याला भेटण्यासाठी आम्हीं मंडळी…. कर्जत येथे निघालो…खरं तर ही भेंट घडवून आणण्याचा योग जुळवून आणला तो त्याच विभागात काही वर्षांपूर्वी कर्जत येथे शिक्षकी कारकिर्दीची सुरवात करणारे आणि …श्री चंद्रशेखर जी जुईकर यांचे सहकारी शिक्षक मित्र … श्रीमंत कौशिक जी ठाकूर सर यांनी …आम्हीं दुपारी २ :०० वाजताच्या सुमारास कर्जत येथील …गुरुकुल गृहनिर्माण संस्था गुरू नगर च्या इमारतीच्या प्रवेश द्वारावर पोहचताच प्रथमदर्शनी नजरेत पडली ती … सुंदर अशी सुस्वागतम नावाची रांगोळी … त्या इमारती मधल्या रहिवाशांनीं …ह्या… महानूभवाच्या .. स्वागता करिता काढली होती !….तद्नंतर…जेव्हा आम्हीं तळमजल्यावर असलेल्या त्यांच्या घरात प्रवेश करताच समोरच दिसलं …खुर्चीत बसलेलं शांत – संयमी ,चेहऱ्यावर स्मितहास्य असलेलं राजबिंडा तरुण … अर्थात …प्रतिक जी जुईकर आम्हांला पाहून खुर्चीतून उठतं आपल्या वडिलांसोबत आमचं स्वागत करत आम्हांला आसनस्थ व्हायला सांगत स्वतः आपल्या हातून आम्हांला पेढे देऊन आपल्या आनंदोत्सवात सामील करत आपल्या मनाच्या मोठेपणाचं दर्शन दिलं ते ह्या… महानुभवानं!… संपूर्ण देशभरातून आय.ए.एस. अधिकारी पदाच्या यादीत समाविष्ट झालेल्या ह्या कर्तृत्ववान तरुणाला अभिनंदनाच्या वर्षावात न्हाहून निघतांना आज प्रत्यक्ष ह्याची डोळा पाहायला मिळालं ! … आज त्यांच्या घरी अभिनंदन आणि शुभेच्छा देण्यासाठी जमा झालेली ती शुभचिंतकांची मांदियाळी पाहून आमचं मन धन्य झाले!…आणि ..तिथलं एक दृश्य पाहून आश्चर्यचकित सुद्धा झालो ते म्हणजे… त्यांच्या …घरातील समोरच्या प्रदर्शनी भिंतीच्या कपाटा समोरील संपूर्ण जागा व टेबल आणि बाजूच्या दोन भिंतीच्या कोपऱ्यातील लाकडी सोफ्याचे कोपरे ( कोना ) …..अक्षरशः ….फुलगुच्छ,आणि भेटवस्तूंनीं भरून गेले आहेत !…आपल्या समाज बांधवांच्या कडून आणि मित्र मंडळी व हितचिंतकाच्यां कडून एवढा अभिनंदनाचा वर्षाव होत आहे ह्या आपल्या विजयवीरावर!…आणि हे सर्व पाहून आमचा ऊर सुद्धा अभिमानानं भरून आला. हिमालयाच्या उंची एवढी मोठी साकारलेली ध्येयपूर्ती …पण …चेहऱ्यावर किंवा मनात ….काडीमात्र गर्व नाही की अहंकार !…अगदी साफ निर्मल स्वच्छ पाण्यासारख्या स्वभावाचा संपूर्ण परिवार !…आणि .. विनम्र ,सुसंस्कारी स्वभावानं सर्वांना आपलंसं करणारा ….आपल्या संपूर्ण… रायगड वासीयांचीं शान !…आगरी समाज्याचा अभिमान !!… आय.ए.एस. अधिकारी … प्रतिक चंद्रशेखर जुईकर…यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करून त्यांना आपल्या पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या
Leave a Reply