ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन होणार मोर्चाला प्रारंभ

January 22, 202120:14 PM 121 0 0

जालना दि. 22 :- सन 2021 च्या जनगणनेत ओबीसी, व्हीजेएनटी, एनटी, एसबीसी समाजाची जात निहाय जनगणना करुन या जनगणनेची आधिकृत आकडेवारी जाहिर करावी व या लोकसंख्येच्या प्रमाणात केंद्र शासनाने आरक्षणाची अंमलबजावणी करावी. या आणि अन्य् प्रमुख मागण्यांसाठी जालना येथे येत्या 24 जानेवारी रविवार रोजी ओबसी समाजाच्या वतीने विशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जालना जिल्हा ओबीसी मोर्चा समन्व्य समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आज येथे एका पत्रकार परिषदेत दिली.

औरंगाबाद रोडवरील हॉटेल अथर्वच्या सभागृहात आयोजीत करण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेत अधिक माहिती देतांनी समन्वय समितीचे पदाधिकारी म्हणाले की, ओबीसी प्रवर्गाच्या आरक्षणाला धक्का लागू नये. असंवैधानिक नॉन क्रिमिलिअरची अट रद्द झाली पाहिजे, ओबीसी विद्यार्थ्यांना एससी., एस.टी., विद्यार्थ्यांप्रमाणे 100% स्कॉल्रशिप मिळाली पाहिजे. राज्यातील पत्येक शासकिय व निमशासकिय आस्थापनांमध्ये झालेल्या दोषपुर्ण बिंदू नामावलींची चौकशी करुन नव्याने बिंदू नामावली तयार करावी, मंडळ आयोग लागू होऊनही केंद्र व राज्य सरकारच्या नोकऱ्यांमध्ये, ओबीसींना 27% प्रतिनिधित्व मिळाले नाही हा बॅकलॉग तात्काळ भरावा, ओबसीसी अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रमोशन मध्ये आरक्षण मिळाले पाहिजे, ओबीसी, भटके विमुक्त व एसबीसी विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक तालूका स्तरावर निवासी हॉस्टेल झाले पाहिजे, महाज्योतीला 2 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन द्यावा इत्यादी मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधन्यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या मोर्चासाठी ओबीसी समाजाचे जेष्ठ् नेते तथा राज्याचे ओबीसी मंत्रालयाचे मंत्री मा. ना. विजय वडेट्टीवार, वनमंत्री मा. ना. संजय राठोड, माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर, माजी ग्रामविकास मंत्री श्रीमती पंकजाताबाई मुंडे, खा. श्री. राजीव सातव, मा. खा. समीर भुजबळ, माजी मंत्री महादेव जानकर, चंद्रशेखर बावणकुळे, मा. खा. भागवत कराड, मा. खा. विकास महात्मे, माजी मंत्री अतुल सावे, मुस्लिम ओबीसी समाजाचे राष्ट्रीय नेते शब्बीरभाई अन्सारी, मा. योगेश टीळेकर, मा. आ. संतोष बांगर, मा. आ. नरेंद्र पवार, श्री. नरेंद्र दराडे, श्री. प्रकाश आन्ना शेंडगे, श्री. बबनराव तायवडे, श्री. अविनाश ठाकरे, श्री. विजय चौधरी या मान्यवरांना ओबीसी मोर्चा संयोजन समितीच्या वतीने निमंत्रीत करण्यात आलेले आहे. मोर्चाच्या नियोजनासाठी ओबीसी मोर्चा संयोजन समितीतील सर्व पदाधिकारी तसेच विविध समाजाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यांसह प्रत्येक गावांमध्ये समाज बांधवांची बैठका घेऊन ओबीसी विशाल मोर्चा मागची भूमिका मांडुन मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याची आवाहन ठिक ठिकाणी केले आहे. प्रत्येक गावांसह तालुका, जिल्हा पातळीवर तसेच शहरी भागातील ओबीसी, व्हिजेएनटी, एसबीसी, समाज बांधवांकडुन या मोर्चासाठी उत्सफुर्त प्रतिसाद मिळाला असुन मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होण्याचा निर्धार करण्यात आलेला आहे.

ओबीसी, व्हिजेएनटी, एसबीसी समाजाच्या प्रमुख मागण्यांसाठी दि. 24 जानेवारी रविवार रोजी जालना येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या पासुन मोर्चा काढण्यात येणार आहे. ओबीसी मोर्चा समन्व्य समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन रविवारी सकाळी 11 वाजता या मोर्चाला प्रारंभ होणार आहे. नंतर हा मोर्चा काद्राबाद, पाणिवेस, मस्तगड, गांधी चमन, टाऊनहॉल, शनिमंदीर चौक, उड्डाण पुल, नुतन वसाहत मार्गे, जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. याठिकाणी समस्त् ओबीसी समाज बांधवांच्या वतीने राज्याचे ओबीसी मंत्रालयाचे मंत्री श्री. विजय वडेट्टीवार यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे संयोजन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *