ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

आरक्षण हक्क कृती समितीसह रिपब्लिकन सेनेचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला

June 27, 202114:11 PM 9 0 0

जालना (प्रतिनिधी) ः महाविकास आघाडी सरकारने मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्याविरोधात आरक्षण हक्क कृती समितीने राज्यव्यापी मोर्चाची हाक दिली होती. आज झालेल्या मोर्चामध्ये रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशावरून तसेच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सागर डबरासे यांच्या सूचनेवरून राज्यव्यापी मोर्चास जालना जिल्ह्यातील रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.


या मोर्चामध्ये जिल्हाध्यक्ष लिंबाजी वाहुळकर, जिल्हा संपर्क प्रमुख आण्णासाहेब चित्तेकर, महासचिव एक्स आर्मी चंद्रकांत खरात, जिल्हा संघटक मच्छिंद्रआप्पा खरात, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेश वानखेडे, ॲड. अशोक वाहुळकर, ॲड. मदन पंडीत, जालना ता. अध्यक्ष भिमराज खरात, जिल्हा उपाध्यक्ष अरूण म्हस्के, अंबड तालुकाध्यक्ष गोरख आकुट, समाधान खरात, जिल्हा सहसचिव नवनाथ ठोके, भानुदास साळवे, ता. सचिव कैलास लहाणे, मधुकर म्हस्के, युवक ता. अध्यक्ष दिनेश वाहुळ, दगडू जाधव, महिला जिल्हाध्यक्षा कमलबाई जोगदंड, महासचिव कांताबाई बोरूडे, जिल्हासंघटक मथुराबाई मोरे, संपत वानखेडे, जिल्हाउपाध्यक्ष शोभाबाई म्हस्के आदींची उपस्थिती होती.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *