जालना (प्रतिनिधी) ः चंदनझिरा परिसरातील विविध वस्त्यांमध्ये रस्ते, पाणी, भुमिगत गटार योजना ईत्यादी नागरी सुविधांची 80 टक्के कामे पुर्ण झाली आहे. येणाऱ्या कालावधीत उर्वरीत कामे मार्गी लावण्यात येईल अशी ग्वाही महाराष्ट्र विधिमंडळ आश्वासन समितीचे प्रमुख आ. कैलास गोरंट्याल यांनी येथे बोलतांना दिली.
चंदनझिरा परिसरात असलेल्या सुंदरनगर भागात जालना नगर पालिकेकडून दलित वस्ती योजने अंतर्गत करण्यात येणाऱ्या पुलाच्या कामाचा शुभारंभ युवानेते अक्षयकुमार गोरंटयाल यांच्याहस्ते काल शनिवारी करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करतांना आ. गोरंट्याल बोलत होते.
यावेळी प्रभागाचे नगरसेवक तथा काँग्रेसचे गटनेते गणेश राऊत, नगरसेवक मालनबाई दाभाडे, राधाकिसन दाभाडे, शिवप्रकाश चितळकर, रमेश गवारे, शेख निजाम, रामकिसन पारे, रामू फोरमेन, डॉ. वसंत टकले यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी पुढे बोलतांना आ. गोरंट्याल म्हणाले की, चंदनझिरा परिसरात वास्तव्यास असलेल्या नागरीकांना विशेषतः महिला भगिनींना मागील कालावधीत पाण्यासाठी मोठी पायपिट करावी लागत होती. पाणी टंचाईचा हा प्रश्न गटनेते गणेश राऊत आणि नगरसेवीका श्रीमती मालनबाई दाभाडे यांनी आपल्यासह नगराध्यक्षा सौ. संगीता गोरंटयाल यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर हा प्रश्न प्राधान्य क्रमाने सोडवून प्रत्येकाच्या घरात पाणी पोहचविले आहे. शिवाय अंतर्गत रस्ते, भुमिगत गटार योजना, लाईट, स्वच्छता ही कामे देखील प्राधान्याने करून नागरी सुविधा देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहे. सुंदरनगर भागातील नागरीकांच्या रहदारीचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नगर पालिकेच्या माध्यमातून दलित वस्ती योजने अंतर्गत नविन पुलाचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. हे काम झाल्यानंतर या भागातील नागरीकांचा रहदारीचा प्रश्न दुर होईल असा विश्वास व्यक्त करून चंदनझिऱ्यासह परिसरातील विकासाची उर्वरीत कामे लवकरच पुर्ण करण्यात येईल असे आश्वासन आ. गोरंट्याल यांनी यावेळी दिले. तत्पुर्वी युवानेते अक्षय गोरंट्याल यांनी आपल्या भाषणातून आ. कैलास गोरंट्याल व नगराध्यक्षा सौ. गोरंट्याल यांच्या माध्यमातून शहरातील प्रत्येक प्रभागात नगर पालिकेने विकासाची भरिव कामे केली आहे. भविष्यात देखील विकासाचा आलेख असाच कायम राहील अशी ग्वाही त्यांनी दिली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी चंदनझिरा प्रभागाचे नगरसेवक तथा गटनेते गणेश राऊत यांनी प्रास्ताविक करून प्रभागातील समस्या आ. गोरंट्याल यांच्यासमोर मांडल्या आणि पाणी प्रश्नासह अन्य विकासाची कामे मार्गी लावल्यानंतर त्यांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमास परिसरातील नागरीक, महिला, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply