नांदेड प्रतिनिधी ( रुचिरा बेटकर ) : संस्कृतीत गुरूंना अत्यंत आदराचे स्थान असून देशाच्या इतिहासात, गुरूची भूमिका समाजाला सुधारणेकडे नेण्यासाठी तसेच क्रांतीला दिशा दर्शविणारी आणी मार्गदर्शक म्हणून राहिली आहे असे प्रतिपादन नांदेड येथिल गुरुद्वारा लंगर साहिब चे प्रमूख जथेदार संत बाबा नरेंद्रसिंघ यांनी केले.
संत बाबा नरेंद्रसिंघ यांच्या सानिध्यात नानक साई ग्रुपने गुरू पौर्णिमा साजरी केली. यावेळी ते आशीर्वाद पर अशीर्वचन करताना बोलत होते. जो ब्रह्म स्वरुपात अज्ञानाचा नाश करतो तो गुरु आहे. भारतीय संस्कृतीत गुरूंना अत्यंत आदरणीय स्थान आहे. गुरूची भूमिका समाजाला योग्य दिशा दाखवण्यात यशश्री राहिली आहे असे सांगून संत बाबा नरेंद्रसिंघ यांनी शीख पंथात गुरू ग्रंथ साहिब यांनाच गुरू मानले जाते आणि ते सर्वश्रेष्ठ आणि परिपूर्ण गुरू आम्हाला लाभले आहेत याचा शीख पंथाला गर्व वाटतो असे ते म्हणाले. लंगर साहिब च्या श्री गुरू नानक हॉल मध्ये हा गुरू पोर्णिमेनिमित्त अशीर्वचनाचा कार्यक्रम नानक साई फाऊंडेशनने आयोजित केला होता.
संत नामदेव महाराज यांचा कृपा आशीर्वाद लाभलेल्या ‘घुमान चळवळीचे सारथी तथा शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमूख धोंडू पाटील (मामा),लेबर फेडरेशनचे संचालक सुधाकरराव भाऊ पिलगुंडे, तुलसीदास भुसेवार, तुकाराम कोटूरवार, विनायक पाथरकर,धनंजय उमरीकर,राम पाथरकर आणि नानक साई फाऊंडेशनचे प्रमूख पंढरीनाथ बोकारे यांच्यासह घुमान चळवळीतील प्रमूख सहकारी कालच्या गुरू पौर्णिमा उत्सवात सहभागी झाले होते.. यावेळी लंगर साहिब चे प्रमूख जथेदार संत बाबा नरेंद्रसिंघ यांचा नानक साई फाऊंडेशन च्या वतीने गुरू पौर्णिमाचे औचित्य साधून त्यांच्या धार्मिक व सामाजिक कार्याचा गौरव म्हणून सत्कार करण्यात आला.
Leave a Reply