ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

बुद्ध तत्त्वज्ञानातच दु:खमुक्तीचे मूळ – भदंत पंय्याबोधी थेरो

January 4, 202113:58 PM 64 0 0

नांदेड – मानवाला त्याच्या आयुष्यात अनेक प्रकारे दु:खांचा सामना करावा लागतो. माणसातील तृष्णाच दु:खनिर्मिती करीत असते. तृष्णा हेच दु:खाचे मूळ आहे, असे तथागतांनी सांगितले. तसेच दु:ख हरण्याचा मार्गही सांगितला. बुद्ध तत्त्वज्ञानातच दु:खमुक्तीचे मूळ आहे असे प्रतिपादन भदंत पंय्याबोधी थेरो यांनी कंधार तालुक्यातील कुरुळा मुक्कामी केले. यावेळी भंते मेत्तानंद, भंते संघरत्न ,भंते चंद्रमणी ,भंते धम्मकीर्ती ,भंते सुदर्शन,भंते श्रद्धानंद, भंते पूर्णबोधी, भंते रोहन , भंते संजीव, भंते संघप्रिय, भंते अश्वजित, श्रामणेर प्रशिक्षणार्थी संघ, उमाजी आप्पाराव नरवाडे, वामन नरवाडे, धम्मसंदेश व धम्मदान यात्रेचे संकल्पक गंगाधर ढवळे, ज्येष्ठ साहित्यिक अनुरत्न वाघमारे, ग्रामीण कवी नागोराव डोंगरे, कवी कैलास धुतराज, निवृत्ती लोणे, सरपंच उमाकांत चिवडे, प्रा. राजू चिवडे, बाळासाहेब गोमारे, ख्वाजा शेख, मगदूम शेठ, बाजीराव धुळगंडे, शिवदर्शन चिवडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले जयंतीचे औचित्य साधून श्रामणेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव नांदुसा येथून कंधार तालुक्यातील कुरुळा येथे धम्मसंदेश व धम्मदान यात्रेचे पदार्पण झाले होते. आंबेडकर नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला भदंत पंय्याबोधी थेरो यांनी पुष्पहार अर्पण करून धम्मरॅलीस प्रारंभ करण्यात आला. रॅलीचे नेतृत्व नागोराव डोंगरे, निवृत्ती लोणे व रणजीत गोणारकर यांनी केले. गावातील प्रमुख रस्त्यावरुन प्रबुद्ध नगर येथे रॅलीची सांगता करण्यात आली. त्यानंतर विश्र्वशांती बुद्ध विहारात धम्मदेसना कार्यक्रमात भदंत पंय्याबोधी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, प्रापंचिक जीवनात एकामागून एक इच्छा, अपेक्षा निर्माण होतात. त्या शेवटपर्यंत संपतच नाहीत. बुद्धाला तृष्णेवर मात करून निर्वाणात जाण्याची कला अवगत होती. बुद्धाने कला इतरांना शिकविली. यावेळी भंते संघरत्न आणि भंते पूर्णबोधी यांनीही उपस्थितांना धम्मदेसना दिली. तसेच चैतन्या नरवाडे, कल्याणी नरवाडे, अनुरत्न वाघमारे, नागोराव डोंगरे, उमाकांत चिवडे, कैलास धुतराज, बाळासाहेब गोमारे यांची समयोचित भाषणे झाली.

विश्र्वशांती बुद्ध विहारात घेण्यात आलेल्या कार्यक्रमात सुरुवातीला तथागत गौतम बुद्ध, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित बौद्ध उपासक उपासिकांनी भिक्क्खु संघाचे पुष्प आणि धम्मदान देऊन स्वागत केले. उपासकांनी याचना केल्यानंतर भंते पंय्याबोधी थेरो यांनी त्रिसरण पंचशिल दिले. त्यानंतर भारतीय सैनिक राहुल ढवळे, जयराम ढवळे यांच्याकडून भिख्कु संघाला फळदान करण्यात आले. भिक्खु संघाला व सर्व उपासक उपासिकांना पंडित ढवळे व प्रकाश ढवळे यांच्या परिवाराने भोजनदान दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गंगाधर ढवळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. रणजीत गोणारकर तसेच अनुरत्न वाघमारे यांनी केले तर आभार पंडित ढवळे यांनी मानले. यावेळी भैय्यासाहेब ढवळे, प्रल्हाद ढवळे, सुरेंद्र ढवळे, बबन ढवळे, हनमंत ढवळे, प्रशांत ढवळे, माणिक ढवळे, धम्मानंद गायकवाड आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला गावातील व खुरगाव येथील बौद्ध उपासक उपासिका यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *