जालना प्रतिनिधी : डॉ. ओमप्रकाश मोतीपावले रोटरी प्रांतपाल व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मनुज जिंदल यांच्या प्रेरणेने रोटरी क्लब ऑफ जालना मिडटाऊनच्या वतीने प्रत्येकाने एका माणसाला कोविड लस घेण्यासाठी प्रेरीत करावे, जेणे करून लसीकरण संपुर्ण समाजाचा शक्य होईल.
आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त लसीकरण संदर्भात साक्षीकरण गरजेचे असल्यानेच रोटरी मिडटाऊन तर्फे लसीकरण साक्षरता अभियान घेतले जात असल्याबाबत रोटरी क्लब ऑफ जालना मिडटाऊनचे अध्यक्ष अॅड. महेश धन्नावत यांनी प्रतिपादन केले.
यासाठी रोटरी क्लब ऑफ जालना मिडटाऊन संपूर्ण प्रांतात प्रचार-प्रसार करीत आहे व यासंदर्भात परिपत्रकाचे विमोचन हे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मनुज जिंदल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मनुज जिंदल यांनी सांगितले की, सर्वांनी कोविड लस घ्यावी जी कवच कुंडल प्रमाणे या महामारीत कार्यरत असते. तसेच रोटरी क्लबचे कौतुक सुध्दा त्यांनी यावेळी केले व भविष्यात रोटरी क्लब सोबत विविध उपक्रम घेतले जातील असे आश्वासन दिले. रोटरी परिवार तर्फे संपुर्ण कुटूंबाचे लसीकरण करून त्यांचे फोटो सुध्दा सोशल मिडीयावर प्रकाशित करुन व ध्वनी संदेश द्वारे जनजागृती करण्यात येत आहे. यावेळी अॅड. संजय काळबांडे यांनी सुध्दा रोटरीचे कौतुक केले व बाल हक्कासाठी त्यांनी कार्य करावे याबाबत सुचना दिल्या.यावेळी रोटरी क्लब ऑफ जालना मिडटाऊनचे अध्यक्ष अॅड. महेश धन्नावत, सचिव प्रशांत बागडी व सदस्य उपस्थित होते.
Leave a Reply