ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

श्री शंभू महादेवाच्या यात्रेमध्ये कोरोनाच्या नियमांचे पालन करावे- प्रांताधिकारी शैलेश सुर्यवंशी यांचे आवाहन.

April 1, 202214:31 PM 40 0 0

सातारा हिरकणी(विदया निकाळजे) : शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाची यात्रा येत्या 2 एप्रिल पासून 13 एप्रिल पर्यंत संपन्न होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी, माण चे तहसीलदार रिचर्ड यानथन,फलटण च्या नायब तहसीलदार संजीवनी सावंत,गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील,सहायक पोलिस निरीक्षक श्री संतोष तासगवकर, तालुका वैदयकीय अधिकारी श्री लक्ष्मण कोडलकर, श्री शंभू महादेव देवस्थानचे व्यवस्थापक श्री ओंकार देशपांडे ,मानकरी, पुजारी सरपंच रेश्मा शिंगाडे आणि ग्रामपंचायत आजी माजी सदस्य सरपंच यांच्या उपस्थितीत विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती.
कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालावधीनंतर प्रथमच श्री शंभू महादेवाची यात्रा भरणार असून त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातुन भक्त गण श्री महादेवाच्या दर्शनासाठी येणार आहेत. यावेळी कोरोनाचे सर्व नियम पाळले पाहिजेत अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा श्री संतोष तासगवकर यांनी दिला. संपूर्ण कालावधीत सर्वांनी काळजी घ्यावी,व्यावसायिकांनी आपल्या व्यवसायबाबत काळजी घेऊन कोरोनाच्या लसीचे प्रमाणपत्र तसेच निरोगी कर्मचारी कामास ठेवावेत.
आरोग्य विभाग यात्रेसाठी सज्ज असून 66 कर्मचारी, अधिकारी, 6 रुग्णवाहिका, 108 नंबरच्या दोन रुग्णवाहिका ,यात्रा परिसरात 4 विशेष आरोग्य पथके नियुक्ती करण्यात आली असल्याचे वैदयकीय अधिकारी यांनी सांगितले. यात्रेदरम्यान कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.असे आवाहन करण्यात आले.

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *