ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

करोनाची दुसरी लाट संपत नाही तर झिका व्हायरसचा प्रवेश तर डेंग्यूने दहशत निर्माण केली

August 4, 202113:57 PM 56 0 0

महामारीच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण भारतात मृत्यूचे तांडव निर्माण केले होते.दुसरी लाट थोडी संथ होत नाही तर आता झिका व्हायरसने भारतात एन्ट्री केल्याचे दिसून येते.त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत डेंग्यूने दहशत निर्माण केल्याचे दिसून येते.त्यामुळे झिका व्हायरसचा प्रवेश महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात होवु शकतो याला नाकारता येत नाही.केरळमध्ये झिका व्हायरसचे २ रूग्ण आढळून आले तर महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातील पुरंदर तहसील येथे ५० वर्षीय महिलेला झिका व्हायरसची लागन झाली आहे.यामुळे या नवीन व्हायरसने चिंता वाढवीली आहे.तर दुसरीकडे डेंग्यू आपले पाय पसरवून कहर निर्माण केल्याचे दिसून येते.त्यामुळे डेंग्यूने सुध्दा सर्वसामान्यात दहशतीचे वातावरण निर्माण केल्याचे दिसून येते.यात मुख्यत्वेकरून डेंग्यूने नागपुरला जास्तच जखडल्याचे दिसून येते.नागपूर शहरात संपूर्ण झोन वाईज डेंग्यूच्या जंतुंची तपासणी करण्यात आली. दिनांक ३१ जुलै शनिवारला झोननिहाय अहवालानुसार शहरात ६४९७ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले.त्यात २८२ घरांमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या ही चिंतेची बाब आहे. या सर्वेक्षणात ९० रूग्णांना ताप असल्याचे आढळून आले.यावरून स्पष्ट होते की नागपूर शहरात डेंग्यूने प्रवेश केल्याचे दिसून येते ही बाब चिंताजनक आहे.मनपाच्या तपासणीमध्ये २०३ घरातील कुलरमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या.यावरून स्पष्ट होते की कुलरमध्ये डेंग्यूच्या अळ्यांना आपणच जबाबदार आहोत.

कारण कुलरचे पाणी वेळोवेळी बदलवीले असते तर कुलरपासुन डेंग्यूचा होणारा प्रादुर्भाव रोखता आलाच असता.त्यामुळे कुलरमध्ये डेंग्यूच्या अळ्यांना आपणच जबाबदार आहोत असे मला वाटते.कारण करोनातुन दिलासा मिळत नाही तर तोच डेंग्यूने गंभीर परिस्थिती निर्माण केली आहे.जानेवारी ते आतापर्यंत २७५ रूग्ण आढळून आले असून यातील १७७ रूग्ण मागील २६ दिवसातील आहे.ही अत्यंत गंभीर आणि चिंताजनक बाब आहे.पावसाच्या पाण्याने जे डपके तयार होतात यातही डेंग्यूच्या अळ्या राहु शकतात याला नाकारता येत नाही.त्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगुन स्वच्छतेकडे जास्त लक्ष देण्याची गरज

आहे.कारण नागपूर साठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी पाण्याचे डपके, सांडपाणी,टायरमधील पाणी किंवा अन्य जमा असलेल्या पाण्यामध्ये डेंग्यूच्या अळ्यां राहु शकतात याला नाकारता येत नाही.त्यामुळे सर्वांनीच सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.नागपूरात २६ दिवसात डेंग्यूचे १७७ रूग्ण व ३ रूग्णांचा मृत्यू ही बाब नागपूरकरांसाठी चिंताजनक आहे.नागपूरसाठी सांगायचे झाले तर नागपूर मनपामध्ये १५० नगरसेवक आहेत.प्रत्येक नगरसेवकांनी आपल्या वार्डात किंवा प्रभागात फेरफटका मारून व घरोघरी जाऊन डेंग्यूपासुन बचाव करण्यासाठी ताबडतोब मोहीम आखली पाहिजे.आरोग्यविभाग आपल्या पध्दतीने कार्य करीत आहे.परंतु नगरसेवकांचे प्रथम कर्तव्य बनते की नगरची सेवा करने.याअंतर्गत नगरसेवकांनी घरोघरी जाऊन डेंग्यूचा होणारा प्रादुर्भाव ताबडतोब रोखण्यासाठी पाऊल उचलण्यासाठी प्रशासनाला योग्य ती मदत केली पाहिजे.नागरिकांनीसुध्दा लक्षात ठेवले पाहिजे की डेंग्यूच्या अळ्यां आढळल्यास ताबडतोब प्रशासनाला कळवीने गरजेचे आहे.कारण अनेक तालुक्यांत व जिल्हयामध्ये डेंग्यूच्या रुग्णांची झपाट्याने वाढ होतांना दिसत आहे ही गंभीर बाब आहे.याकरीता प्रशासन, लोकप्रतिनिधी यांनी गांर्भियाने दखल घेऊन डेंग्यूच्या अळ्यांचा नायनाट करण्यासाठी युध्दपातळीवर मोहीम राबवली पाहिजे.त्याचप्रमाणे नागरिकांनी सुध्दा सतर्क राहून स्वच्छतेकडे जास्तीत जास्त लक्ष देण्याची गरज आहे.कारण डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखायचा असेल तर सर्वांनीच स्वच्छतेला प्रथम प्राधान्य देण्याची गरज आहे.सध्याच्या परिस्थितीत हवामान बदलामुळे डेंग्यू, मलेरिया,चिकनगुनिया त्याचबरोबर साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढु शकतो.त्यामुळे नागरिकांनी व नगरसेवकानी स्वच्छतेकडे लक्ष देण्याची गरज आहे.त्याचप्रमाणे कडुनिंबाच्या पाणांचा धुळ केल्याने मच्छरावर आपल्याला अंकुश लावता येतो.कारण कडुनिंबाचा पाला हा जंतू नाशक आहे.
लेखक
रमेश कृष्णराव लांजेवार.
(माजी विद्यापीठ प्रतिनिधी नागपूर)
मो.नं.९९२१६९०७७९, नागपूर.

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *