ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

मंदावलेली सांस्कृतिक चळवळ पुन्हा बहरेल : सुंदर कुँवरपुरियाँ

November 7, 202114:23 PM 49 0 0

जालना ( प्रतिनिधी) : कोरोना परिस्थिती मुळे सार्वजनिक होणारे नाट्य प्रयोग,बालनाट्य महोत्सव, सांस्कृतिक कार्यक्रमांत खंड पडला तरी या काळात नवीन कलाकृती निर्मीती साठी अनेक विषय मिळाले असून शासनाने आता परवानगी दिली असल्याने मंदावलेली मराठी रंगभूमी पुन्हा नव्याने उभारून येईल. असा विश्वास जेष्ठ रंगकर्मी, नाट्य लेखक,दिग्दर्शक तथा नाट्यांकुर चे सचिव सुंदर कुँवरपुरियाँ यांनी येथे बोलतांना व्यक्त केला. मा. कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृह परिसरात नाट्यांकुर बालनाट्य संस्थेच्या वतीने जागतिक मराठी रंगभूमी दिन शुक्रवारी ( ता. 05) उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्त आयोजित कार्यक्रमात सुंदर कुँवरपुरियाँ बोलत होते. प्रकल्प प्रमुख आशीष रसाळ, जयेश पहाडे, सौ. रूपाली सेठ, अभिजीत कावले, अमित काळे यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.

 

सुंदर कुँवरपुरियाँ पुढे म्हणाले,स्व. विष्णू दास भावे यांची जयंती मराठी रंगभूमी दिन म्हणून साजरी करत असतांना या ऐतिहासिक दिनी नव्या ने नाट्य संहिता लेखन, नाटक, अभिनयांच्या तालीम सुरू करणे अभिप्रेत असल्याचे नमूद करत सांस्कृतिक क्षेत्रात सक्रीय असलेल्या धुरिणांनी त्या सुरू कराव्यात. अशी अपेक्षा सुंदर कुँवरपुरियाँ यांनी व्यक्त केली. प्रकल्प प्रमुख आशीष रसाळ यांनी रंगभूमी चा बंद पडदा पुन्हा उघडण्यास परवानगी दिल्याबद्दल शासनाचे अभिनंदन करून पुर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा सुरळीत चालू झाल्यावर रितसर परवानगी ने बालनाट्य महोत्सव आयोजित करण्यात येईल. असे सांगितले. रंगभूमी दिन व प्रकट दिनाचे औचित्य साधून सुंदर कुँवरपुरियाँ यांचे अभिष्टचिंतन आणि सत्कार करण्यात आला. सुञसंचालन सौ. रूपाली सेठ यांनी केले तर प्रकल्प प्रमुख जयेश पहाडे यांनी आभार मानले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *