ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जनरेटरच्या धुराने कुटुंब संपवलं, झोपेतच 6 जणांचा मृत्यू

July 13, 202113:13 PM 22 0 0

चंद्रपूर : जनरेटरच्या धुराने गुदमरुन एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाला आहे. चंद्रपूर शहरालगत दुर्गापूर भागात ही धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडली आहे. वीज गेल्याने रात्री जनरेटर लावून हे कुटुंब झोपलं होतं. मात्र जनरेटरच्या धुरामुळे 7 पैकी 6 जणांवर काळाने घाला घातला. सर्व मृत हे लष्करे कुटुंबातील आहेत. मृतांमध्ये चार मुलांचाही समावेश आहे.

नेमकं प्रकरण काय?
चंद्रपूर शहरालगत दुर्गापूर भागात लाईट गेली होती. त्यामुळे लष्करे कुटुंबाने घरातील जनरेटर संच लावला होता. रात्री लाईट नसल्यामुळे जनरेटर संच तसाच लावून हे कुटुंब झोपी गेलं. मात्र जनरेटरच्या धुराने घर भरलं. या धुरामुळे झोपेतच सर्वजण गुदमरले आणि 7 पैकी 6 जणांचा मृत्यू झाला.
दुर्गापूर भागात वॉर्ड क्र. ३ मध्ये हा सर्व प्रकार घडला. सर्व मयत हे मजूर वर्गातील सदस्य आहेत. रात्री वीज गेल्यावर घरात या कुटुंबाने डिझेल जनरेटर संच लावला होता. या धुरामुळे त्यांचे श्वास गुदमरले. सकाळी शेजारच्या लोकांना शंका आल्यावर घटना उघडकीस आली. सर्व मयत आणि एकमेव वाचलेल्या व्यक्तीला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.

मृतांमध्ये रमेश लष्करे- 44, अजय लष्करे-20, लखन लष्करे 9, कृष्णा लष्करे आठ, माधुरी लष्करे 18, पूजा लष्करे 14 यांचा समावेश आहे. तर दासू लष्करे 40 हा एकमेव सदस्य बचावला असून पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केलाय.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *