राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे जालना जिल्हा दौर्यावर आले त्यांनी पत्राकारांसोबत संवाद साधला, यावेळी ते बोलत होते, त्यापुर्वी त्यांनी शहरातील विविध ठिकाणी विकास कामाचे लोकार्पण केले तर काही कामाचे भुमीपुजन कले. याच दिवसी जालना शहरातील रसायन तंत्रज्ञान उपकेंद्र येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, आमदार नारायण कुचे, कुलगुरु आर.आर. देशमुख,कुलसचिव प्रा. उदय अन्नपुरे, उपसंचालक डॉ. पराग नेमाडे, प्रा. अनिरुद्ध पंडित, प्रा. गिरीष जोशी, प्रा. मनोज गावंडे, प्रा. सौरव राज, प्रा. लाहोटी, मनोज पांगारकर, उद्योजक सुनिल रायठठ्ठा, आशिष मंत्री, भाऊसाहेब घुगे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले, जागतिक स्तरावर नावाजलेली (आयसीटी) रसायन तंत्रज्ञान संस्थेचे केंद्र मॉरीशियस, आसाम व तीसरे उपकेंद्र जालना येथे मंजुर करण्यात आले आहे. जालना जिल्ह्यासह मराठवाड्यातील सर्वसामान्यांच्या पाल्यांना या ठिकाणी उच्चदर्जाचे शिक्षण मिळणार असल्याने या उपकेंद्रासाठी 203 एकर मंजुर करण्यात आलेल्या जागेचे रेखांकन करुन ही जागा तातडीने ताब्यात घेण्यात यावी. तसेच या जागेत वॉल कंम्पाऊंडचे कामही गतीने करुन घेण्याबरोबरच या ठिकाणी पायाभुत सुविधांची अत्यंत चांगल्या दर्जाची उभारणी व्हावी यासाठी तज्ज्ञांसह जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन अत्यंत चांगल्या दर्जाचा आराखडा तयार करण्याचे निर्देशही मंत्री सामंत यांनी यावेळी दिले.
आयसीटी ही स्वायत्त संस्था असली तरी या उपकेंद्रासाठी शासनामार्फत 165 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यामुळे संस्था व शासनाचे प्रतिनिधी यांनी एकत्रित व समन्वय साधुन हे उपकेंद्र अधिक चांगले होईल व याचा फायदा जालना जिल्ह्यासह मराठवाड्यातील व राज्यातील विद्यार्थ्यांना अधिक प्रमाणात कसा होईल, यादृष्टीने अत्यंत सुक्ष्म पद्धतीने नियोजन करण्याच्या सुचना करत रसायन तंत्रज्ञान संस्थेच्या उपकेंद्रासाठी विद्यमान शासनाने 20 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला असल्याचे सांगत गत तीन वर्षात या संस्थेपे जागेच्या भाड्यापोटी पाच कोटी रुपये अदा केले असुन या रक्कमेबाबत तसेच या ठिकाणी मंजुर करण्यात आलेल्या पदाबाबत एक सदस्यीय समिती नेमत अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या माणीला यशजालना येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या नव्याने प्रस्तावित केलेल्या इमारतीच्या कामासाठी किमान दिड कोटीचा निधी लागणार असून तो उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून उपलब्ध करुन देण्यात यावा अशी मागणी माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी केली होती. सदरील मागणी तात्काळ पुर्ण करीत आपण त्या इमारतीच्या कामासाठी दिड कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देतो, त्यासाठी तात्काळ दिड कोटी रुपयाचा प्रस्ताव तातडीने पाठवा असेही उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगीतले.
लसीकरण केंद्राला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची भेट
माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या पुढाकाराने भाग्यनगर येथे सुरु करण्यात आलेल्या लसीकरण केंद्रास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी भेट दिली असून या लसीकरण केंद्राचे कौतुक केले. माजी राज्यमंत्री खोतकर यांनी सुरु केलेल्या कामाची माहिती मुख्यमंत्री महोदयांना देतो आणि असेच उपक्रम राज्यभरात राबवावेत अशी विनंती करतो असेही त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेत सांगीतले.
Leave a Reply