ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

राज्य मनोरुग्ण मुक्त होईल

September 18, 202114:28 PM 51 0 0

सर्व प्राण्यांमध्ये निसर्गाने मानवालाच बुद्धी दिलेली आहे.इतर प्राण्यांच्या मानाने मानव हा केवळ आपल्या बुद्धीच्या जीवावरच आपल्या पेक्षा ताकदवान असणाऱ्या प्राण्यावर सुद्धा अधिराज्य गाजवू लागलेला आहे.पण या बुद्धीची व्यवस्थीत वाढ झाली नाही तर मात्र तोच मानव या पशू पेक्षाहि अगदी हीन जीवन जगत असलेला आपण पहात असतो. तो म्हणजे मनोरुग्ण किंवा ग्रामीण भाषेत त्याला वेडा असे म्हणतात.निसर्गाने बुद्धी देऊन सुद्धा काही शारीरिक किंवा मानसिक बदलाने काहींच्या बुद्धीचा काहीच उपयोग होत नाही.त्यामुळे त्या इसमास चांगले वाईट ,आपले परके, जवळचा कोण ,लांबचा कोण एक ना अनेक प्रकारचे ज्ञानच खुंटल्यामुळे अशा मानवाची कसलीच प्रगती झालेली दिसून येत नाही.त्याला जन्म देणारे सुद्धा अशा मनोरुग्ण मुलाचा अगर मुलीचा ” रोजचे मडे त्याला कोण रडे” या म्हणी नुसार त्याची काळजी घेत नाहीत.त्याला हवे त्या दवाखान्यात सुद्धा घेऊन जात नाहीत पालकांचा सुद्धा नाविलाज झाले मुळे हे बिचारे मनोरुग्ण (वेडे)कोठेही आपल्या गावातच नव्हेतर जिकडे रस्ता जाईल तिकडे रस्त्याने फिरत असतात.ऊन,वारा, पाऊस,थंडी यापासून त्यांचे कोणीहि संरक्षण करीत नाहीत.


वेळचे वेळी कोठेहि अन्न मिळत नसलेने ,राहणेस निवारा,अंगाला पुरेसे वस्त्र,शरीराचे आरोग्य स्वच्छतेच्या अभावाने असाध्य अशा रोगांनी रोगग्रस्त झालेले दृश्य बऱ्याच गावा गावा मधून पाहवयास मिळते.प्रत्येक गावामध्ये एक दोन तरी असे भटकंती करणारे केस ,दाढी वाढलेले, मळकट कपडे, अंगावर मळ याचा थर साचलेला ,पोटाला पोटभर नाही, कुठे कचरा कुंडी किंवा खरकटे कुठे कुत्र्या मांजरांना टाकलेले असलेले अन्न खात असलेले दृश्य पाहून हा ” मानव प्राणीच आहे ना ?” असाच प्रश्न मनात येऊन दुःख वाटते.निसर्गाने याच बिचाऱ्यावर अशी वेळ का बरे आणावी ? हा प्रश्न पुन्हा पुन्हा मनामध्ये सारखा तरळत होता.मग असे जीवन तरी त्याला का असावे.असा मानव जगला काय किंवा मेला काय या बाबत समाजाला काहीहि देणे घेणे नाही. आताच्या समाजातील लोक त्याला मदत करण्या ऐवजी उलट त्याला जागो जागी त्याची चेष्टा मस्करी करतील काही महाभाग तर त्याला दगड सुद्धा मारून पिटाळण्याचा प्रयत्न करतात.
प्रवास करताना अशाच एका मनोरुग्णास लिंब फाटा पुलाचे जवळ ता.सातारा कोणी अज्ञात रिक्षा चालकाने रिक्षा थांबवून त्या मनोरुग्णाच्या हातातील असणारी काठी घेऊन गुरासारखा मारला होता बिचारा मनोरुग्णाचे त्याचे शक्तीपूढे काहीच चालत नव्हते.मारूनच थांबला नाही तर त्याला रस्त्यावरून गटरामध्ये पुन्हा पुन्हा ढकलून देत होता.पण त्या मूर्खास एवढे कळत नसावे हा बिचारा वेडा आहे.त्याच्याकडून रिक्षाला हात दाखवला हे क्षुल्लक काहीहि कारण असले तरी सातारा पुणे या हायवेला रिक्षा थांबवून त्याला बेदम मारहाण करून पुण्याच्या दिशेला मार्गस्थ झाला.त्या मनोरुग्ण याची अवस्था पाहून मन अगदी दुःखी झाले अशांचे दुःख कोण जाणणार ? त्याला दवाखान्यात कोण घेऊन जाणार ? बिचाऱ्याला बुद्धी नसले मुळेच गुरासारखा मार सोसून सुद्धा तोच वेडा अधून मधून लिंब फाटा ते नागेवाडी या दरम्यान दिसत असतो.हे एक उदाहरणा दाखल घडलेले पाहिलेले आहे.अशा बऱ्याच घटना वेगवेगळ्या मनोरुग्णा संबंधी आपल्या आसपास घडत असतात.सदर वेडा असल्या मुळे त्याचे कोणी ऐकून घेत नाही.त्याला नीट सांगता येत नाही.त्यामुळे याची काळजी घेणार तरी कोण ?
आपल्या देशात मानव आयोग असेल आणि प्रत्येकाला जगण्याचा अधिकार असेल तर या अशा मनोरुग्ण यांना संरक्षण कोण देणार ? याची काळजी कोण घेणार ? याबाबत मानव आयोगाकडे काही योजना असतील अगर नसल्या तरी अशा मनोरुग्णासाठी काही त्यांच्या हिताच्या योजना निर्माण करणे गरजेचे आहे.त्यांना संरक्षण देने घटने नुसार त्या त्या राज्य सरकारचे काम आहे.त्यासाठी शासनाने अशा मनोरुगणाचा गावोगावी शोध घेऊन जवळच्या शासकीय दवाखाण्यात त्यांना घेऊन जाऊन त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांचेवर उपचार करणे गरजेचे आहे.ज्यांचे कोणी नसते त्यांचे माय बाप हे सरकार असते असे आपण म्हणत असू तर आपल्या घटनेनुसार जनतेच्या जीविताची काळजी घेणे सरकारचे काम आहे.त्यासाठी राज्य सरकारने केंद्र शासनाच्या मदतीने एक जनकल्यानकारी मोहीम काढून गावोगावी अशा मनोरुगणाचा शोध घ्यावा.त्यासाठी स्वतंत्र आरोग्य,पोलीस,स्थानिक सेवाभावी संस्थांची N.G.O. ची मदत घेऊन अशा मनोरुग्नाना पकडून त्यांचेवर उपचार करून ही वाया जाणारी मनुष्य शक्तीचा उपयोग आपल्या देश उभारणी साठी होऊ शकेल हा लांबचा विचार असला तरी त्याची सुरुवात ही केलीच पाहिजे.
परवा तर एका पुलाचे शेजारी कचरा कोणी टाकलेला होता त्यामध्ये भाकरी शोधून एक मनोरुग्ण त्याच्या पोटाची आग शमवीत असलेले पाहून मन अगदी दुःखी झाले.त्यामुळे ही व्यथा समाजाला किंवा शासनाला कळली तर शासन त्यावर नक्कीच उपाय शोधून काढील. कुत्री मांजरापेक्षा पुढची अवस्था अशी केवळ बुद्धीच्या अभावाने मनोरुग्ण निर्माण होत असेल तर शासनाने चालू अर्थसंकल्पा मध्ये विशेष निधीची तरतूद करावी.चांगले धडधाकट असणाऱ्या साठी वेगवेगळ्या योजना आहेत परंतु अशा निराधार मनोरुग्णा साठी सरकरने योजना आखून मनोरुग्ण भविष्यात शोधून सापडणार नाही अशीच कार्यवाही केली पाहीजे.
शासनाने यासाठी जी गावे मनोरुग्ण मुक्त होणेस मदत करतील किंवा आपले ग्रामपंचायती मार्फत काय उपाय योजना करून अशा मनोरुगणाचा शोध घेऊन शासकीय दवाखान्यात दाखल करतील अशा गावांचा ग्रामपंचायतीचा विशेष पारितोषिके देऊन सत्कार केला पाहिजे.कोणतीही जनतेच्या हिताची मोहीम राबवित असताना तिचा प्रसार व प्रचार स्थानिक पातळी पर्यंत पोहचला पाहिजे.त्यासाठी वेगवेगळ्या दैनिकामधून आकाशवाणी,दूरदर्शन वाहीन्याच्या मधून प्रसार व प्रचार तसेच चर्चासत्रे आयोजित केली पाहिजेत.नेपोलियन बोनापार्टच्या भाषेत सांगावयाचे झालेतर या पृथ्वीतलावर कोणतेही काम अशक्य नाही.पण ते काम सरकारने करणेचे एकमताने मनावर घेतले पाहिजे.ही गावोगावी असणारी मनोरुग्ण ही काय परदेशातून आलेली नाहीत.आपल्या देशातील आपलेच देश बांधव असतील तर शेवटी त्यांची काळजी तुम्ही आम्ही नाही तर कोण घेणार ? जनतेच्या कोणत्याही मोहिमेमध्ये सरकारला जनतेने मदत करणे गरजेचे आहे.सर्व सरकारनेच केले पाहीजे हे म्हणणे चूक आहे.त्यासाठी समाजातील जनतेने या मानवाच्या विकासा साठी त्या बिचाऱ्या मनोरुगणना त्यांचे गतवैभव प्राप्त करून देणेचे पुण्य तरी पदरात पडल्या शिवाय राहणार नाही.
केवळ आपण अगदी पहिलीच्या वर्गापासूनच प्रतिज्ञा शिकलेलो आहोत ती प्रतिज्ञा प्रत्येकाची तोंडपाठ असेल ” भारत माझा देश आहे.सारे भारतीय माझे बांधव आहेत…” पण माझ्या देशातील सर्व बांधव सारखे नाहीत.त्यातील असे मनोरुग्ण असेल तर त्याची त्यामधून मुक्त करणेचा प्रयत्न केला पाहिजे.पुढे आपण म्हणतो ” त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी यातच माझे सौख्य सामावलेले आहे “ही प्रतिज्ञा तोंडपाठ असणे आणि प्रत्यक्षात कृती विरोधी असेल तर योग्य नाही.या ठिकाणी सद्गुरू वामनराव पै यांची विश्व प्रार्थना आठवल्या शिवाय रहात नाही…
हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धी दे आरोग्य दे
सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव
सर्वांचं भलं कर,कल्याण कर आणि
तुझे गोड नाव अखंड मुखात राहू दे ”
त्यासाठी मायबाप सरकारलाच या मनोरुगणाचे बाबत योग्य ते निर्णय घेणे साठी “सरकारलाच चांगली बुद्धी दे”असेच म्हणावेसे वाटते.तर आणि तरच ” राज्य मनोरुग्ण मुक्त होईल ”
लेखक
जी.एस.कुचेकर पाटील भुईंज
तालुका वाई जिल्हा सातारा
मो.न. ७५८८५६०७६१.

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *