ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

सूक्ष्मातील स्पंदनांचा अभ्यास हा आध्यात्मिक प्रगतीसाठी पायाभूत घटक !

June 11, 202113:11 PM 67 0 0

कोणतेही धार्मिक अथवा आध्यात्मिक संशोधन, प्रशिक्षण असो त्यांत सूक्ष्मातील स्पंदनांचा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा असतो. (सूक्ष्मातील जाणणे म्हणजे पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या जाणीवेच्या पलिकडे असलेले ज्ञान अथवा स्पंदने ओळखणे) एखाद्या जिवाला साधना करून आध्यात्मिक प्रगती करायची असल्यास त्याने सूक्ष्मातील स्पंदनांचा अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे. अध्यात्मातील या पैलूचा अभ्यास जितका अधिक, तितकी साधनेत चुकीच्या मार्गाने जाऊन मनुष्य जन्म वाया जाण्याची शक्यता अल्प असते. पर्यायाने अध्यात्मातील हा पैलू समजून घेतल्यास व्यक्ती तिच्या साधना प्रवासात आध्यात्मिक दृष्टीने योग्य निर्णय घेऊ शकते, असे ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’चे श्री. शॉन क्लार्क यांनी सांगितले. ते ‘सूक्ष्मातील स्पंदनांचा अभ्यास धार्मिक शिक्षण आणि संशोधन यांचा पायाभूत घटक’ या विषयावरील शोधनिबंध सादर करतांना श्री. क्लार्क बोलत होते.

कोर्दाबा, स्पेन येथे ‘रिलिजन इन सोसायटी रिसर्च नेटवर्क अँड कॉमन ग्राऊंड रिसर्च नेटवर्क्स’ या संस्थेने एक आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली होती. त्या धर्म आणि अध्यात्म या विषयावर आयोजित या 11 व्या परिषदेत हा शोधप्रबंध मांडण्यात आला. या शोधनिबंधाचे लेखक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले असून श्री. शॉन क्लार्क सहलेखक आहेत. ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने वैज्ञानिक परिषदेत केलेले हे 72 वे सादरीकरण होते. या पूर्वी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने राष्ट्रीय स्तरावर 15, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर 56 शोधनिबंध सादर करण्यात आले आहेत आणि त्यांना 4 आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये ‘उत्तम शोधनिबंधा’चे पुरस्कारही मिळाले आहेत.

श्री. शॉन क्लार्क यांनी सूक्ष्मातील स्पंदनांचा अधिक अभ्यास करण्यासाठी ‘पिप’ आणि ‘यूनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ ही उपकरणे वापरून केलेले विविध प्रयोग आणि त्यांचे परिणाम यांचीही माहिती दिली.

प्रयोग 1 : ‘पिप’ आणि ‘यू.ए.एस्.’ ही उपकरणे वापरून हा प्रयोग अध्यात्मावरील 3 ग्रंथांवर करण्यात आला. यांपैकी एक ग्रंथ जगातील लोकप्रिय अध्यात्मविषयक मार्गदर्शकाने लिहिला आहे. हा ग्रंथाच्या लक्षावधी प्रती विकल्या गेल्या असून त्याचा समावेश ‘न्यूयार्क बेस्ट सेलर’ यादीतही आहे. दुसरा ग्रंथ स्वतःला अध्यात्मविषयक मार्गदर्शक म्हणून संबोधित न करणार्‍या पण अध्यात्मविषयक पुस्तके लिहिणार्‍या लेखकाने लिहिला असून त्याची विक्रमी विक्री झालेली आहे. याचाही समावेश ‘न्यूयार्क बेस्ट सेलर’ यादीत करण्यात आलेला आहे. तिसरा ग्रंथ भारतातील परात्पर गुरुंनी लिहिलेला आहे. परात्पर गुरु म्हणजे ज्यांची आध्यात्मिक पातळी 90 टक्क्यांपेक्षा अधिक आहे, असे उच्च पातळीचे गुरु. संतांनी लिहिलेल्या ग्रंथातून सर्वाधिक सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होत आहेत, असे चाचणीद्वारे सिद्ध झाले. इतर दोन लेखकांच्या ग्रंथांतून विविध स्तरांवर नकारात्मक स्पंदने निर्माण होत आहेत, असेही लक्षात आले.

प्रयोग 2 : वरील ग्रंथ दोन व्यक्तींना प्रत्येक 20 मिनिटे वाचायला सांगण्यात आले. ‘यू.ए.एस्.’ या प्रणालीद्वारे या व्यक्तींची वाचनापूर्वीची आणि नंतरची प्रभावळ मोजण्यात आली. त्या वेळी पहिली दोन पुस्तके वाचून ‘या व्यक्तींच्या प्रभावळीत नकारात्मकता वाढली आहे’, असे लक्षात आले. तिसरा ग्रंथ वाचल्यावर या दोन व्यक्तींमध्ये निर्माण झालेली नकारात्मकता नष्ट झाली आणि त्यांच्यात सकारात्मता निर्माण झाली.

प्रयोग 3 : या प्रयोगात तीन चित्रकारांनी काढलेल्या महालक्ष्मी देवीच्या चित्रातून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा अभ्यास करण्यासाठी ‘पिप’ या प्रणालीचा वापर करण्यात आला. यांपैकी एक प्रतिथयश चित्रकार होते, दुसरे व्यावसायिक चित्रकार होते. तिसरे ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’तील चित्रकार साधक होते, ज्यांनी हे चित्र परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली काढले होते. यांपैकी प्रतिथयश चित्रकाराने काढलेल्या चित्रातून सकारात्मक स्पंदनांपेक्षा नकारात्मक स्पंदने अधिक प्रमाणात प्रक्षेपित होत होती. व्यावसायिक चित्रकाराने काढलेल्या चित्रातून सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होत होती आणि चित्रकार साधकाने काढलेल्या चित्रातून अत्याधिक प्रमाणात सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होत होती.

प्रयोग 4 : तीन चित्रकारांनी काढलेल्या महालक्ष्मी देवीच्या चित्रातून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा अभ्यास ‘यू.ए.एस्.’ प्रणालीच्या साहाय्यानेही करण्यात आला. तेव्हा प्रतिथयश चित्रकाराने काढलेल्या चित्राची नकारात्मक प्रभावळ 1.35 मीटर इतकी होती. साधक चित्रकाराने काढलेल्या चित्रामध्ये नकारात्मक स्पंदने नव्हती, उलट त्याची 2.56 मीटर इतकी सकारात्मक प्रभावळ होती.

प्रयोग 5 : जगभरातील विविध धार्मिक स्थळांतून आणलेल्या जलांच्या 24 नमून्यांचा अभ्यास ‘यू.ए.एस्.’ उपकरणाच्या साहाय्याने करण्यात आला. त्यांपैकी 40 टक्के जलांच्या नमून्यांतून नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होत होती. त्यांपैकी एका जलाच्या नमून्याची नकारात्मक प्रभावळ सर्वोच्च म्हणजे 4.6 मीटर इतकी होती.

प्रयोग 6 : या प्रयोगात मूळ स्वस्तिक, उलटे स्वस्तिक, 45 अंशानी झुकलेले स्वस्तिक आणि नाझी स्वस्तिक यांच्यातून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा अभ्यास ‘यू.ए.एस्.’उपकरणाच्या साहाय्याने करण्यात आला. यांपैकी केवळ मूळ स्वस्तिक चिन्हाला सकारात्मक प्रभावळ होती, इतर सर्वांना नकारात्मक प्रभावळ होती. नाझी स्वस्तीकाभोवती असलेली नकारात्मक ऊर्जेची प्रभावळ ही आतापर्यंत करण्यात आलेल्या आध्यात्मिक संशोधनात आढळून आलेली सर्वाधिक आहे, असे श्री. क्लार्क यांनी सांगितले.

प्रयोग 7 : या प्रयोगात 4 प्रकारच्या संगीतशैलींचा व्यक्तीवर होणारा परिणाम ‘यू.ए.एस्.’ उपकरणाने मोजण्यात आला. त्यांपैकी ‘हेव्ही मेटल’ संगीत ऐकून नकारात्मकता वाढली, शांत संगीताचा काही परिणाम जाणवला नाही, एका प्रसिद्ध गायकाच्या आवाजातील भारतीय शास्त्रीय संगीत ऐकल्यावर काही प्रमाणात सकारात्मता वाढली आणि एका संतांनी गायलेले भक्तीसंगीत ऐकून पुष्कळ प्रमाणात सकारात्मकता वाढली.

या प्रयोगांचा निष्कर्ष सांगताना श्री. क्लार्क म्हणाले, ‘साधनेच्या मूलभूत सिद्धांतानुसार नियमित साधना केल्याने आध्यात्मिक दृष्ट्या सकारात्मक ऊर्जा मिळते आणि नकरात्मक उर्जा न्यून होते. तसेच साधनेतील सातत्यामुळे काही काळाने आध्यात्मिक दृष्टीने सकारात्मक आणि नकारात्मक स्पंदनांतील भेदही समजू लागतो.’

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *