ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

शिक्षक संघाने घेतली गटशिक्षणाधिकारी यांची भेट

August 24, 202219:08 PM 15 0 0

सातारा (विदया निकाळजे) : शिक्षक संघाने घेतली गटशिक्षणाधिकारी यांची भेट समस्या सोडवण्याची मागणी माण तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने माणचे गटशिक्षणाधिकारी माणिक राऊत यांची भेट घेऊन तालुक्यातील शिक्षकांच्या समस्या सोडवण्याची आग्रही मागणी केली. संघाचे तालुकाध्यक्ष तथा शिक्षक बँकेचे व्हा.चेअरमन महेंद्र अवघडे यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक संघाने मंगळवारी पंचायत समिती दहिवडी येथे गटशिक्षणाधिकारी माणिक राऊत यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी विस्तार अधिकारी रमेश गंबरे उपस्थित होते.

शिक्षण परिषदा शुक्रवारी घ्याव्यात, तालुकास्तर आदर्श शिक्षक पुरस्कार कार्यक्रम ५ सप्टेंबर नंतर लगेच घ्यावा,विद्यार्थी आधार कार्ड काढण्यासाठी शिक्षकांना वेठीस धरू नये,नवीन धोरण राबवताना संघटनांना विश्वासात घ्यावे,हिंदी भाषा सूट प्रस्ताव मंजूर करावेत,DCPS धारकांचे ७ वा आयोग हप्ता जमा करावा,PFMS प्रणालीचे प्रशिक्षण केंद्र स्तरावर द्यावे,शिक्षक समानीकरन, पंचायत समिती शिक्षण विभागात क्लार्क ची पदी रिक्त असणे या सर्व विषयावर संघाने आग्रही भूमिका मांडली.

या सर्व विषयावर गटशिक्षणाधिकारी राऊत यांनी प्रश्नांची सोडवणूक करण्याची ग्वाही दिली.

संघटनेचे कार्याध्यक्ष महेश माने यांनी प्रश्नांची मांडणी केली तर रामभाऊ खाडे यांनी प्रास्ताविक केले. आभार सुगंधराव जगदाळे यांनी मानले.
यावेळी मोहन जाधव,पोपट जाधव,किशोर देवकर,श्रीमंत खाडे,बळीराम विरकर, दत्ता खाडे,दिलीप गंबरे, शशिकांत खाडे,डी.एस.खाडे, दत्ता गलांडे यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *