ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

३१ व्या सेपक टकरा राज्य अजिंक्यपद स्पर्धे साठी नांदेड जिल्हाचा संघ रवाना

September 18, 202113:45 PM 16 0 0

वर्धा येथे १७ ते १९ सप्टेंबर २०२१ दरम्यान होणाऱ्या ३१ व्या सेपक टकरा राज्य अजिंक्यपद स्पर्धे साठी नांदेड जिल्ह्याचा चा संघ आज रवाना झाला लिटील स्कॉलर्स पब्लिक स्कुल च्या प्रांगणात दिनांक 15 सप्टेंबर २०२१ रोजी झालेल्या जिल्हा निवड चाचणीतून वर्धा येथे होणाऱ्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी नांदेडजिल्हाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी खेळाडूंची निवड करण्यात आली.

निवड झालेल्या खेळाडूंना शुभेच्छा व अभिनंदन करण्यासाठी जिल्हाक्रीडा अधिकारी  श्री राजेश्वर मारावार , क्रीडाधिकारी श्री किशोर पाठक सर , गुरूदिपसिंग संधू नांदेड जिल्हा सेपक टकरा असोसिएशनचेचे सचिव श्री प्रवीणकुमार कुपटीकर , क्रीडा मार्गदर्शक अनिल बंदेल संतोष कणकावार के एम पाटील विद्यालय चे मुख्याध्यापक सुनील मैड मान्यवर उपस्थित होते श्री राजेश्वर मरावार यांनी यावेळी खेळाडूंना मार्गदर्शन करताना खेळाडूंनी इथून पुढे खेळाचा सराव जोमाने करावा त्यासाठी योग्य साहित्याची मदत करण्याचे आश्वासन दिले खेळाला जिल्ह्यात प्रसारासाठी लागणारी सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले इतर सर्व मान्यवरांनी पुढील राज्य स्पर्धेसाठी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या व पुढील स्पर्धेसाठी आज संघ वर्धा साठी रवाना झाला नांदेडच्या संघामध्ये निवड झालेले खेळाडू पुढील प्रमाणे
मुले समीर शाकिर काझी (कप्तान) , प्रतिक गंगाधर सोनटक्के, आनंद संतोष पंडित, राजकुमार नागोराव गोवंदे , श्रीराम मारोती कदम,निशांत अशोकराव कदम, अरहंत सुभाष पाईकरावा, सचीन उत्तमराव कांबळे, असंग सुधीर जोंधळे , क्षितिज तुकाराम सूर्यवंशी, रोहित जयराम सूर्यवंशी , आदित्य देवेंद्र खडसे , सुमेध गंगाधर गायकवाड , मुली श्रुती रमेश धनजकर (कप्तान), नंदिनी मुंजाजी आळणे, अनुष्का रामकीशन सूर्यवंशी, श्रद्धा सूरजसिंग अवस्ति , प्रतिक्षा सुरेश सोनकांबळे, ऐश्वर्या युवराज तत्तापुरे, वैष्णवी सुनील मैड , प्रेरणा प्रकाश खाडे, अनुष्का व्यंकटराव धनवे,प्रिती साईनाथ लोखंडे, प्रियंका श्रीनाथ लोखंडे,तेजस्विनी विजय वाठोरे आदी. संघासोबत डॉ. अभिजित विक्रम खेडकर ( संघ व्यवस्थापक ), रविकुमार हरिदास बकवाड ( प्रशिक्षक )

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *