ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

शार्क टँक संदर्भात सिद्धात तवरावाला करणार मार्गदर्शन

February 26, 202213:52 PM 35 0 0

जालना प्रतिनिधी : प्रसिद्ध टि. व्ही. सिरीयल शार्क टँक ज्यामध्ये युवा तथा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या उद्योजकांना आर्थिक पाठबळ दिले जाते व त्यांना प्रोत्साहन दिले जाते, त्या शोमध्ये जालना येथील पी-शुटर डिस्पोजेबल युरीन बॅग निर्माता सिद्धांत तवरावाला ज्यांनी बी.टेक तथा एम.बी.ए. ची डिग्री प्राप्त केली आहे व त्याची कंपनी बॉम्बे स्टॉक एक्सेंज मध्ये सुद्धा नोंदणीकृत केलेली आहे

तथा शार्क टँक मधील इन्व्हसेटरांनी त्यांच्या प्रकल्पात आर्थिक पाठबळ देण्याचे मान्य केले आहे. तथा आय. आय. टी. अहमदाबाद निती आयोग व विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय यांनी सुद्धा त्यांच्या प्रकल्पाला मान्यता व प्रशस्ती दिली आहे, ते रोटरीच्या ११७ वर्ष पूर्ण झाले असल्याने युवा उद्योजकांना जे रोटरीचे सदस्य आहे, त्यांना मार्गदर्शन करणार आहे. तरी रोटरी मिडटाऊन व रोटरी सदस्यांनी त्यांच्या मुलासह या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष अॅड. महेश धन्नावत, सचिव प्रशांत बागडी व संचालक मंडळाने केले आहे. सदर मार्गदर्शन सत्र शनिवारी सकाळी ९ वाजता मधुबन हॉटेल येथे होणार आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *