ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

ओमिक्रॉनचा व करोनाचा धोका राजकीय पुढाऱ्यांमुळेच वाढत आहे

January 3, 202213:44 PM 61 0 0

देशात सरकारने किंवा निवडणूक आयोगाने सध्या होवून घातलेल्या युपीसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका ताबडतोब पुढे ढकलाव्यात व सभांवर आवर घालावा.कारण करोना व ओमिक्रॉनचा धोका वाढत असल्याचे सरकारच सांगत आहे.सध्या देशाला निवडणुकांची आवश्यकता नसुन वाढता ओमिक्रॉनला व करोनाला रोखण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न करण्याची गरज आहे.राजकीय पुढारी लोकांना करोना महामारी व ओमिक्रॉनचा वाढता धोका पहाता लोकांना गाईडलाईन किंवा सल्ला देतात आणि राजकीय पुढारी सत्ता हस्तगत करण्यासाठी व राजकीय पोळी शेकण्यासाठी राजकीय पुढारीच संपूर्ण करोना नियमांचे धज्जीया उडवीतांना दिसत आहे हे स्वतंत्र भारताचे दुर्भाग्यच म्हणावे लागेल.ओमिक्रॉनची खबरदारी नागरिकांनीच घ्यावी काय सरकार व राजकीय पुढाऱ्यांनी का घेवू नये?देशात सर्वप्रथम गर्दीला जबाबदार राजकीय पुढारीच आहेत.कारण राजकीय पुढाऱ्यांनीच येणाऱ्या विधानसभा निवडनुकांना सर्वप्रथम प्राधान्य दिल्याचे दिसून येते.राजकीय पुढाऱ्यांना निवडणुकीची काळजी जास्त व सर्वसामान्यांची अजीबात काळजी नसल्याचे दिसून येते.ऐकीकडे निवडणुक आयोग सांगत आहे की निवडणुका वेळेवरच घेतल्या जातील.दुसरीकडे केंद्र व राज्य सरकार सांगत आहे की ओमिक्रॉनचा धोका वाढतो आहे.मग खरे कोण आणि खोटे कोण!ओमिक्रॉनबद्दल खरं काय आणि खोटे काय! वैष्णवदेवी मंदिरात चेंगराचेंगरी झाली यात 12 भाविकांचा मृत्यू झाला तर अनेक भाविक जखमी झालेत.ही अत्यंत दु:खद व अंगावर शहारे येणारी घटना आहे.

भारतातील ओमिक्रॉनच्या धोक्याबद्दल सरकार,डब्लुएचओ व भारतीय आरोग्य संघटना ज्या प्रमाणे ओमिक्रॉन वाढल्याचे सांगत आहे त्याप्रमाणे सरकारच स्वतःच संपूर्ण नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे दिसून येते.कारण ओमिक्रॉनचा धोका वाढत आहे तर वैष्णोदेवी मंदिरात सरकारने गर्दी का होवू दिली? खरोखरच ओमिक्रॉनचा धोका वाढत आहे हे जर भाविकांच्या किंवा नागरिकांच्या लक्षात आनुन दिले असते तर वैष्णोदेवी मंदिरातील चेंगराचेंगरी नक्कीच टळली असती यात दुमत नाही.नवीन वर्षाच्या सुरुवातीला अशी दु:खद घटना अत्यंत गंभीर व चिंतेचा विषय आहे.देशात 1 जानेवारीला 2022 ला म्हणजे एका दिवसात करोनाचे 22 हजारहून अधिक रूग्ण आढळून आले.यात ओमिक्रॉन सुध्दा भर टाकत आहे.म्हणजेच धोका अजून पर्यंत टळलेला नाही.मग 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पुढारी किंवा सरकार जाहीर सभा किंवा भेटिगाठी कशा काय घेत आहेत हे राजकीय पुढाऱ्यांनी किंवा सरकारने जनतेला समजून सांगायला पाहिजे.अन्यथा असे समजण्यात येईल की करोनाचा धोका फक्त नागरिकांनाच आहे,राजकीय पुढाऱ्यांना नाही.त्यामुळे राजकीय पुढाऱ्यांनो सर्वप्रथम आपल्या सभांवर व भेटीगाठींवर आवर घाला. नंतरच नागरिकांना करोनाच्या नियमांचा धडा शिकवा. करोनाच्या व ओमिक्रॉनच्या नियमांचे पालन कसे करायचे हे भारतीय नागरिकांना चांगल्याप्रकारे ग्यात आहे.फक्त राजकीय पुढाऱ्यांनी सभा व मिटिंगावर आवर घालावा.देशाची राजधानी दिल्ली व आर्थिक राजधानी मुंबई येथील ओमिक्रॉनचा वाढता धोका चिंताजनक आहे.असेही सांगण्यात येते की आता तिसऱ्या लाटेला सुरूवात झाली आहे.त्यामुळे सर्वप्रथम करोना नियमांचे पालन राजकीय पुढाऱ्यांनी करावे नंतर नागरिकांना नियमांचा धडा शिकवावा.नववर्षाच्या पहिल्याच दिवशी भारतातील संपूर्ण धर्मांच्या भाविकांनी मंदिर,मज्जीत,गुरूद्वारा, बौद्ध विहार,चर्च मध्ये गर्दी दिसून आली हि चिंतेची बाब आहे.सरकारने जर भाविकांना नियमांची सुचणा दिली असती तर धार्मिक स्थळांवरील गर्दी अवश्य टळली असती.परंतु सरकारनेच संपूर्ण नियम धुऱ्यावर ठेवले तर भाविक किंवा नागरिक काय करणार? त्यामुळे यात नागरिकांचा दोष नसुन सरकारचा व राजकीय पुढाऱ्यांचाच दोष असल्याचे मी समजतो.कारण राजकीय पुढारी व सरकार स्वतःच संपूर्ण नियमांचे धज्जीया उडवुन राजकारण करतात मग सर्वसामान्य नागरिक काय करणार? त्यामुळे तिसऱ्या लाटेला कसे रोखायचे हे सर्वप्रथम राजकीय पुढाऱ्यांनी व सरकारनेच ठरवायचे आहे.त्याचप्रमाणे निवडणुक आयोगाने वेळेवरच निवडणूका घेतल्या जातील या निर्णयाचा पुनर्विचार करावा व होवू घातलेल्या विधानसभा निवडणुका पुढे ढकलाव्यात अशी माझी आग्रहाची विनंती आहे. लेखक.
रमेश कृष्णराव लांजेवार.
(माजी विद्यापीठ प्रतिनिधी नागपूर)
मो.नं.9921690779, नागपूर.

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *