ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

छत्र्या कारागीरांवर आली उपासमारीची वेळ

July 4, 202215:48 PM 15 0 0

उरण ( संगिता पवार ) : मुसळधार पाऊस सुरु झाला की ,छत्री रेनकोट आदींच्या वस्तूंची खरेदी ,व दुरुस्ती हे दर वर्षाचे आहेच ,दोन दिवस सतत मुसळधार पाऊस सर्वत्र सुर असल्याने छत्री दुरुस्त कारागीर दुरुस्तीच्या कामात व्यस्त असल्याचे दिसत होते .राजपाल नाका ,आनंद नगर ,गांधी चौक ,राजपाल नाका , मंगल जनरल स्टोअर समोर ,गांधी चौक आदी ठिकाणी कारागीर मग्न झाले आहेत .
उरण तालुका सह सर्वत्र मुसळधार पावसाने झोडपले . आठ महिने अड्गली ठिकाणी ठेवलेली छत्री पाऊस सुरु झाला की आपल्यांना आठवण येते .टी शोधून वापरण्यासाठी सर्वांचीच धडपड असते त्यातच ती नादुरुस्त मिळाली तर मग कारागीर कडे जा दुरुस्त करून घ्यावी लागते असी परिस्थिती सर्वत्र दिसत असते .

रेनकोट मुळे छत्री वापरणे कमी झाले आहे छत्री दुरुस्त करण्याचे दर कमी असून तार बसविणे १० रुपये ,मुठ बसविणे ३० रुपये असे दर असतांनाही सध्या आजकाल छत्री दुरुस्त करणे कमी झाले आहे चायना च्या स्वस्त छत्र्या बाजारात उपलब्ध झाल्याने युस अॅण्ड थ्रो झाल्याने छत्री दुरुस्ती चे काम कमी झाले आहे .वर्षातून एकदाच पैसे मिळतात परंतु ते हि कमी झाले आहे त्यामुळे आम्हा कारार्गीरांव्रर उपासमारीची वेळ आली आहे .असे कारागीर राजा वाघरी यांनी सांगितले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *