ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

कोषागार म्हणजे प्रशासनाचा वित्तीय व्यवस्थापनातील महत्त्वाचा कणा – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

February 2, 202215:18 PM 45 0 0

जालना  :- – महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर दिनांक 01 फेब्रुवारी 1965 रोजी लेखा व कोषागारे संचालनालयाची स्थापना झाल्याच्या अनुषंगाने राज्यात दरवर्षी 01 फेब्रुवारी रोजी कोषागार दिन साजरा करण्यात येतो. त्यानुषंगाने जालना कोषागार कार्यालयात ‘कोषागार दिन’ साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, पोलीस अधिक्षक विनायक देशमुख यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने झाली. याप्रसंगी जिल्हाधिकारी श्री राठोड यांनी कोषागार म्हणजेच प्रशासनाचा वित्तीय व्यवस्थापनाचा महत्त्वाचा कणा असल्याचे त्यांचे भाषणात नमुद केले. तर पोलीस अधीक्षक श्री देशमुख, यांनी कोषागार कार्यालय हे वित्त विभागातील महत्त्वाचे शासकीय कार्यालय असल्याचे नमुद केले.

या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले श्री सोळुंके, मुख्य वित्त व लेखा अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी वित्त विभागातील सर्व कार्यालये 100 टक्के संगणीकृत असून त्यामुळे कामात पारदर्शकता दिसून येत असून प्रशासनात वित्त विभागाचे भूमीका किती महत्तवाची आहे हे विषद केले. या कार्यक्रमासाठी श्री पुंडगे, उपमुख्य वित्त व लेखा अधिकारी जिल्हा परिषद, श्रीमती कांचन तावडे, मुख्यलेखाधिकारी नगर परिषद यांनी कोषागार कार्यालयाच्या कामाचे कौतुक करुन कोषागार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाची प्रस्तावना सचिन धस, जिल्हा कोषागार अधिकारी यांनी केली व त्यांनी कोषागार कामाचे महत्त्व सांगितले. तसेच कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्याम मारोडे, लेखालिपीक आणि आभार प्रदर्शन दिनेश वाघ, लेखालिपीक यांनी केले. यावेळी कोषागार कार्यालयातील सर्व कर्मचा-यांचा सत्कार सचिन धस, जिल्हा कोषागार अधिकारी यांनी करुन त्यांच्या कामाचे त्यांनी कौतुक केले. या कार्याक्रमासाठी निशांत पवार, प्रोबेशनरी सहायक संचालक, उमेश कुलकर्णी, अपर कोषागार अधिकारी, सूर्यकांत धोंगडे, उपकोषागार अधिकारी, सोईफ मोहम्मद, उप कोषागार अधिकारी, तसेच कोषागार कार्यालयातील सर्व कर्मचारी आणि वित्त विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *