ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

द ट्रकर एक प्रवास मराठी सिनेमा येतोय प्रेक्षकांच्या भेटीस

August 5, 202212:08 PM 27 0 0

उरण (तृप्ती भोईर ) : द ट्रकर एक प्रवास मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला.. कोणतंही काम किंवा उद्योग लहान किंवा मोठ असं नसतं. परिस्थिती नुसार आपल्या वाट्याला जे काम येईल ते काम प्रचंड मेहनत करून प्रामाणिकपणे त्याला न्याय देणं. त्यात आपली एक वेगळी ओळख निर्माण करुन, त्या कामातून आर्थिक आणि सामाजिक बाजू भक्कम करुन आपल्या कुटुंबाला आणि सोबत अनेक कुटुंबांना सक्षम करणे म्हणजेच एक यशस्वी उद्योजक तयार होणे होय. हा प्रवास सरळ,साधा सोपा नसतो.हा प्रवास करत असताना, अनेक कठीण वळणांचा सामाना करावा लागतो.हे करत असताना काही क्षण असे येतात की वाटतं हा प्रवास अर्ध्या वाटेवरच सोडावा. खूप चढउतार,संघर्ष सातत्याने या प्रवासात डोळ्यासमोर येऊन जातात. पण म्हणतात ना की प्रयत्नार्थी परमेश्वर सतत प्रयत्न करत रहा एक दिवस नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल…
हायवेवर एका ढाब्यावर अतिशय गरीब घरातील एक स्त्री भांडीकुंडी करून आपलं व आपल्या मुलांच घर चालवते. आपल्या लहान मुलांना मोलमजुरी करून येणाऱ्या पैशातून त्याच संगोपन करते. आणि त्यानां ही सोबत घेऊन ढाब्यावर काम करायला शिकवते. एकटी स्त्री असून आपल्या मुलानां स्वतः कष्ट करून कसे कमवावे कस आयुष्यात यशस्वी व्हावं याचे धडे ती सातत्याने त्यानां देते.ढाब्यावर येणारा एक ट्रक ड्रायव्हर माणूसकीच्या नात्याने मुलांना जीव लावतो.तीला बहिणीचा दर्जा देतो.मुलांचा काका होतो. त्यांच्या सोबत राहून त्यांना सतत मार्गदर्शन करतो. तिथे काबड कष्ट करताकरता मुलं मोठी होतात, आणि त्यांचा काका ड्रायव्हर त्यांना ट्रक चालवायला शिकवतो. आणि मग तो स्वतः ट्रक ड्रायव्हर होतो. आणि ट्रक ड्रायव्हिंग करून आपलं घर घराचं संगोपन करायला लागतो. आईलाही तो ढाब्यावर जाण्यास नकार देतो. घरीच थांबून आराम करायला सांगतो.
ट्रक ड्रायव्हिंग करत असताना आयुष्यामध्ये येणाऱ्या अडचणी, प्रवासात येणारे चांगले वाईट अनुभव या सिनेमातून दाखवण्यात आलेले आहेत.ट्रक ड्रायव्हर म्हटलं की त्याला कुणीही लग्नासाठी मुलगी देत नाहीत, त्याला कुठल्याही पद्धतीचा मान सन्मान मिळत नाही. ट्रक ड्रायव्हर हि सुद्धा माणसंच आहेत ना! त्यांचा ही खूप मोठा वाटा आहे या देशाच्या विकासासाठी.आज ट्रक ड्रायव्हर नसते तर आपल्याला हव्या त्या वस्तू घरबसल्या मिळाल्या असत्या का? सामानाची ने आण करण्याचं अतिशय जिकिरीचं आणि मेहनतीच काम ट्रक ड्रायव्हर करत असतात.

त्यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा आहे. ट्रक ड्रायव्हरच आयुष्य किती कठीण परिस्थितीतून जातं.नवीन ट्रक घेतल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या आयुष्यात घडतात. चोरीचा आरोप होणं, ट्रक लूटायचे प्रयत्न होणं, अपघात होणं,ट्रक ला आग लावणं अशा रोजच रोडवर ट्रक ड्रायव्हर सोबत घडणाऱ्या घटना…दिग्दर्शक राजु जाधव यांनी अतिशय जिवंत पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न या चित्रपटात केला आहे. बऱ्याचशा अशा घटना आहेत त्या तुम्हांला हा सिनेमा पाहिल्यानंतर कळतील. आणि एका ट्रक ड्रायव्हरचं आयुष्य तुम्हाला सविस्तर रित्या या सिनेमातून पाहायला मिळेल. त्यासाठी आपण सर्वांनी आवर्जून हा सिनेमा पहावा.अॆ.आर.क्रिएशनचे निर्माते आणि दिग्दर्शक राजु जाधव यांनी आजवर अनेक मराठी,हिंदी सिनेमे आणि नाटक आपल्या अॆ.आर.क्रिएशन बॅनर वर निर्मित आणि दिग्दर्शित केले आहेत. त्यांचाच “द ट्रकर एक प्रवास” हा सिनेमा नुकताच OTT Platforms #Hangama#MX Player#Airtel Xtreme#V Movies#या सर्व ठिकाणी रिलीज झाला आहे.दिसतो आहे.आणि या चित्रपटातील गाणी व ट्रेलर ही Z Music या युट्यूब चॅनल वर दिसत आहेत.तुम्हाला बघता येतील.
राजु जाधव यांनी आजवर त्यांच्या प्रत्येक सिनेमांमध्ये वेगवेगळ्या कथा घेऊन या कथांना न्याय दिला आहे.आणि वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक सिनेमांमध्ये वेगळी कथा,नवीन कलाकारांसोबत प्रसिद्ध अभिनेते घेऊन मांडण्याचा प्रयत्न केला आहे.नवीन कलाकारांना जास्तीत जास्त पुढे आणण्याचा प्रयत्न आजपर्यंत राजु जाधव यांनी प्रामाणिकपणे आपल्या सिनेमातून केलेला आहे. वेगळी संहिता,वेगळा विषय,वेग-वेगळे नवीन तंत्र वापरून आजपर्यंत त्यांनी अनेक सिनेमे नाटक प्रेक्षकांसाठी आणलेले आहेत. एक वेगळ्या धाटणीचा दिग्दर्शक म्हणून राजु जाधव यांची ओळख आहे. लवकरच त्यांचा आणखी एक #MISSES देशमुख #नावाचा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. सिनेमा सादरीकरण करत असताना वेग वेगळे अँगल,नवीन लोकेशन,निसर्ग व त्यातील सौंदर्य त्यांच्या दृष्टीतून सिनेमात पाहताना सातत्याने आपल्याला त्यात वेगळेपण जाणवतं.
“द ट्रकर एक प्रवास”या चित्रपटात सुप्रसिद्ध कलाकार म्हणून यतीन कार्येकर,विजय निकम,प्रणव रावराणे, हेमांगी राव, दिपाली साठे, मयुरेश कोटकर, अनिल रबाडे,छाया डूमरी, प्रणाली चौगुले, सायली धुर्वे, भैरवी कडणे, माधुरी कुंभार, राजू मोरे, संदिप गोलटकर, जितेंद्र आमरे…आणि नवीन पदार्पण – रूही तारु आणि सागर वडाळे यांनी कामे केली आहेत.
तंत्रज्ञ म्हणून यात ज्यांनी जबाबदारी उचलली आहे…*अॆ.आर.क्रिएशन व मिरर मिडिया इंटरटेनमेंट निर्मित चित्रपट “द ट्रकर एक प्रवास”
सह निर्मिती ए.आर.वी.प्रोडक्शन.
दिग्दर्शक:राजु जाधव
निर्माता: प्रशांत कडणे आणि सागर वडाळे,
सह निर्माते: राजु जाधव,अजित डागा,अरविंद चांडक,राहूल बूब, विकास मुंदडा,सादिक खान आहेत.छायाचित्रण: सादिक खान यांचे आहे.संगीत/पार्श्वसंगीत: अमेय नरे /साजन पटेल यांनी दिले आहे.गीते अश्विन भंडारे यांनी लिहिली आहेत.गायक:शैल हाडा, सुहास सावंत, सुप्रिया पाठक आहेत. संकलन:राजु जाधव/नैनेश डिंगनकर यांचे आहे.कार्यकारी निर्माता म्हणून अजय अंजारा/रविंद्र गावडे आहेत.पब्लिसीटि डिझायन: रुपाली वाडगावकर, पी.आर.ओ.म्हणून अजय पंदिरकर यांनी काम पाहिले आहे.
कोल्हापूर च्या ज्योतीबा च्या डोंगरावर आणि कोल्हापूर च्या मातीतील निसर्ग रम्य विविध ठिकाणी या चित्रपटाचं चित्रीकरण करण्यात आले आहे.
त्यामुळे मी प्रेक्षकांना मनापासून विनंती करतो की आपण हा सिनेमा नक्की बघावा आणि भरभरून प्रेम द्यावं…..

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *