ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

संविधानाचे खरे रक्षक सदर बाजार पोलीस : ॲड. अश्विनी धन्नावत

January 30, 202213:49 PM 51 0 0

जालना प्रतिनिधी : जालना शहरातील सदर बाजार पोलीस स्टेशन येथे नुकतेच सायकल चोरनारी टोळी पकडुन लहान मुलांची सायकल परत करण्यात यश मिळविला व त्यामध्ये सुध्दा विधिसंघर्षग्रस्त बालकांना मुख्य प्रवाहात आण्यात सहकार्य केले. या घटनेमुळे लहानमुले जे शाळेत संविधानाचे स्तंभ असलेले पोलीस यंत्रणाबद्दल जाणुन घेतात त्यांना त्यांची जाणीव सुध्दा सदर बाजार पोलीस स्टेशन यांनी करून दिली. लहान मुलांसाठी सायकल हि एका मोठ्या वाहनासारखी असते व त्यावर त्यांचा जिव असतो. अशी सायकल चोरी गेल्यावर त्यांच्या बाल मनावर सुध्दा परिणाम होत असतो.

मात्र सदर बाजार पोलीस स्टेशन यांनी तत्काल दखल घेत सायकल शोधुन दिली व मुलांच्या चेहऱ्यावर हास्य परत आणले. यासाठीॲड. अश्विनी महेश धन्नावत, ॲड. महेश सिताराम धन्नावत, ॲड. बॉबी अग्रवाल, डॉ. शिवदत्त विजयसेनानी, अर्पन गोयल ईत्यादींनी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर पायघन, गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक राजेंद्र वाघ शमचंद्र डेंगे, सुभाष पवार, जगन्नाथ जाधव, सोमनाथ उबाळे, अनिल काळे, रामेश्वर जाधव, धनंजय कवले, दिपक घुगे, मनोहर भुतेकर यांचा सत्कार केला व पोलीस अधिक्षक श्री विनायक देशमुख यांचे आभार मानले.
यावेळी ॲड.अश्विनी महेश धन्नावत यांनी प्रतिपादन केले की, संविधानाचे खरे रक्षक जालना पोलीस असुन कोणतेही जात-धर्म-पंथ, प्रतिष्ठा न पाहता ते लोकांची सेवा अविरत करीत असतात. सण असो तरी तो आपल्यासाठी असतो, मात्र पोलीस सणामध्ये विघ्न येऊ नये म्हणुन कार्यरत असतात व सणामध्ये त्यांना जास्त कार्य सुध्दा करावे लागते.
त्यांनी असेही नमुद केले की, आम्ही तक्रार देण्यासाठी आलो असता पोलीसांनी आम्हाला कल्पना दिली की, सायकल चोर त्यांच्या रेडारवर आहे व त्याची शोध सुरु आहे. तुमची सायकल मिळुन जाईल. हे शब्दच मुलांसाठी वरदान ठरले. पोलीसांचे कार्य व तपास पध्दत जटील असतांना त्यांनी तसे कार्य करुन विधीसंघर्षग्रस्त बालकांची सुध्दा सुटका करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यात सहकार्य केले.
पी.एस. आय. ज्ञानेश्वर पायघन यांनी सुध्दा नमुद केले की, लोकांनी पोलीसांवर विश्वास ठेऊन त्यांना सहकार्य करावे तथा गरज भासले तर त्यांना पंचनामा करण्यामध्ये सुध्दा सहकार्य करावे. अनेकदा फक्त कोर्टात यावे लागेल म्हणुन लोक पंचनामा साठी सुध्दा साक्षीदार म्हणुन सुध्दा येत नाही व फक्त पोलीसांना नाव ठेवतात. खरे म्हणजे पोलीसांनी साक्षीसाठी बोलविले व जर लोकांनी त्यासाठी टाळाटाळ केली तर पोलीस त्यांच्यावर कार्यवाही करु शकते. मात्र पोलीस लोकांना त्रास देत नसुन त्यांना सहकार्य करते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *