ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

देवमुर्ती येथील प्रा.शाळेला गावकऱ्यांनी लावले कुलूप

March 31, 202214:38 PM 53 0 0

जालना(प्रतिनिधी)-तालुक्यातील देवमुर्ती येथील प्राथमिक शाळेच्या (उर्दू) मुख्याध्यापक श्रीमती नफियाबेगम यांच्या गैरवर्तनाबद्दल गावकऱ्यांनी संतप्त होवून शाळेला कुलूप ठोकले असून संबधीत मुख्याध्यापिकेवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले की, जालना तालुक्यातील देवमूर्ती येथील प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका नफीसाबेग खान या शाळेवर शाळेची गुणवत्ता अतिशय ढासळली आहे. त्या शाळेवर नियमित न येणे, उशिराने येणे, शिक्षक, पालक, वरिष्ठ अधिकारी यांच्याशी अरेरावीने वागणे, त्यांना काही विचारले तर आरडाओरड करून शाळेत धिंगाणा घालणे, गुन्हे दाखल करण्याची धमकी देणे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षांच्या परवानगीशिवाय रजेवर जाणे , शाळेचा रेकॉर्ड नियमित न ठेवणे , शाळा व्यवस्थापन समितीच्या नियमित बैठका न घेणे , शालेय कामकाजाची चौकशी केली असता उडवाउडवीचे उत्तरे देणे, दिशाभूल करत धनादेशावर स्वाक्षरी घेणे, शालेय निधीचा गैरवापर करणे, शाळेचा रेकॉर्ड पूर्ण न ठेवणे, पालकांनी विद्यार्थ्याची शैक्षणिक प्रगती बद्दल विचारले असता चुकीची माहिती देणे. यामुळे शाळेच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. सोमवारी (दि.28) रोजी सकाळी 8.00 वाजेपर्यंत एकही शिक्षक शाळेत आले नसल्यामुळे पालकांनी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांचेशी संपर्क केला. त्यांनी मुख्याध्यापिका नफिसागमा फोनवर शाळा उशिराने सुरु होण्याचे कारण विचारले असता खोटी माहिती दिली. शाळेत मुख्याध्यापिका व शिक्षक आले नाही म्हणून शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षांनी केंद्रप्रमुख काकडे यांना फोन केला. ते 9 वाजता शाळेवर उपस्थित झाले. यावेळी केंद्रप्रमुख काकडे यांनी शिक्षक हजेरी व लेट हजेरी दाखविण्याबाबत मुख्याध्यापक यांना मागणी केली तेव्हा त्यांनी आरडाओरड करून कार्यालयात धिंगाणा सुरु केला. केंद्रप्रमुख काकडे यांचेवर पोलीस कार्यवाही करण्याची धमकी देत मोठमोठ्याने गोंधळ घातला. या सर्व बाबींमुळे मुलांचे नुकसान होत कोणी विचारणा केली तर खोट्या तक्रारी देण्याची चमकी देणे, धिंगाणा घालणे, आरडाओरड करणे यामुळे आम्ही त्रस्त झालो आहोत असे गावकऱ्यांनी म्हटले आहे. मुख्याधायापिका नफिसाबेगम खान यांची बदली करून त्यांच्या गैरकारभाराची चौकशी करण्यात यावी अशी मागणी सरपंच सुरेश कदम, शालेय समिती अध्यक्ष हमीद पठाण, महेमूद स.हसन अली, भागवत चौरे, शिवदास म्हस्के, बाबु सय्यद, कदम, लतीफ बाबु, शे जीलान, सुफियान खान, रहित अली, शेख गफार, सय्यद खलील सय्यद कय्युम यांच्यासह इतरांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *