जालना । हिरकणी टीम
जालना जिल्ह्यात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सोबतच अतिवृष्टीने जालना शहरातील गांधीचमन ते लक्कडकोट दरम्यान असलेल्या देहेडकरवाडी येथील रोहित्राजवळील जुनी भिंत कोसळली. ही भिंत कोसळतानाचे दृष्य कॅमेर्यात कैद झाले आहे. या कोसळेल्या भिंतीमुळे कोणतीही जिवती हानी झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे. परंतु राहीलेली भिंत वेळीव उतरवून घेतली नाही तर रोहीत्राचे मोठे नुकसान होण्याची दाट शक्यता असल्याचे स्थानिकांनी म्हटले आहे.
Leave a Reply