ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

नाग देवतांची कला जिवंत ठेवणारे चिरनेर गावातील गोरे कुटुंब

August 11, 202121:28 PM 8 0 0

उरण ( संगिता पवार)   नागपंचमी हा सन मोठ्या भक्तिभावाने संपूर्ण देशामध्ये साजरा केला जातो. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पाचव्या दिवशी नागपंचमी साजरी केली जाते.यावर्षी शुक्रवार दि १३ आँगस्ट २०२१ रोजी नागपंचमी उत्सव आल्याने चिरनेर कला नगरातील गोरे कुटुंबांनी दरवर्षी प्रमाणे यंदाही नागदेवताच्या मातीच्या मूर्ती घडविण्याचे काम हाती घेतले आहे.

नागपंचमीच्या दिवशी सुहासिनी या आपल्या कुटुंबाला, भावाला सुख-शांती, समाधान, आयुष्य वाढण्यासाठी शेत,मालरानात जाऊन नागाची पूजा करतात, तसेच माती पासुन बनवलेल्या नाग देवतांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आप आपल्या घरात करून पुजा केली जाते व त्यांचा आशीर्वाद घेतला जातो. भातशेतीचे नूकसान उंदीर मोठ्या प्रमाणात करत असतात,अशा उंदरांपासून शेतीतील पिकांचे रक्षण नाग देवता करत असल्याने नाग हा शेतकऱ्यांचा हि मित्र आहे.त्यामुळे अनेक शेतकरी हे नागपंचमी उत्सवाचे औचित्य साधून नागदेवताची पुजा मोठ्या भक्तिभावाने करतात.

नागपंचमीच्या दिवसाचे औचित्य साधून घरी स्थापना करण्यात येणाऱ्या नागदेवताच्या मातीच्या मूर्ती घडविण्याचे काम हे चिरनेर गावातील कला नगरातील गोरे कुटुंब गेली अनेक वर्षे करत आहेत.या संदर्भात माहिती देताना दिपा गोरे व दिपक गोरे कुटुंबानी सांगितले की नागपंचमी हा सण देशात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे.ग्रामीण व शहरी भागात ही हा सण मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो.त्यामुळे नाग देवतांच्या मूर्तीना मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने आम्ही कुटुंब दिड हजार नाग देवतांच्या मूर्ती घडविण्याचे काम हे गेली वीस वर्षे आपल्या कुटुंबासह करत आहोत.आणि नागपंचमी उत्सवाचे औचित्य साधून दोन दिवस अगोदर गावात तसेच मुंबई,दादर येथील बाजारपेठेत विक्रीसाठी घेऊन जात असतो.या विक्रीतील मोबदल्यात मिळणाऱ्या पैशातून आमच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी सहकार्य प्राप्त होत आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *