उरण (संगिता पवार ) नुसते साप असे जरी कोणी म्हटले तरी अनेकांची भंबेरी उडते.प्रत्यक्षात साप दिसला तर काय अवस्था होते,हे सांगायला नकोच; परंतु लोकांच्या मनातील सापांविषेयी असणारी भीती दूर करण्यासाठी वन्य जीव निसर्ग संरक्षण संस्थेचे पदाधिकारी, सर्प मित्र गेल्या 2012पासून धडपडत आहेत.या संस्थेने आज पर्यंत जवळ जवळ विविध जातींच्या 1लाख 95हजार सापांना जीवदान देण्याचे काम केले आहे. मुंबई व नवीमुंबई शहराच्या हाकेच्या अंतरावर असणारा उरण हा तालुका समुद्राच्या कुशीत तसेच डोंगर रांगेत वसलेला तालुका आहे.त्यामुळे या तालुक्यात विविध जातींच्या सापांचा अधिवास मोठ्या प्रमाणात आहे.मागील तीस वर्षा पासून या तालुक्यात औद्योगिककरण झपाट्याने वाढत असल्याने,अशा वाढत्या औद्योगिकिकरणामुळे मोठ्या प्रमाणात माळरांनाचे, डोंगर भागाचे उत्खनन केले जात आहे.अशा दगड आणि मातीच्या उत्खननामूळे विविध जातींचे साप मोठ्या प्रमाणात स्वतःचे संरक्षण,अन्न शोधण्यासाठी रहिवाशांच्या वस्तीत शिरताना दिसत आहेत.
परंतु भीतीपोटी व अंधश्रध्देपायी माणसांकडून विनाकारण साप मारले जात असतात.खरे तर हे भूतलावरील जीव पर्यावरणाचा महत्त्वाचा घटक आहेत.त्याना मारून आपण कळत नकळत पर्यावरणाचा संतुलनावर घाला घालत आहोत.त्यामुळे सापांच्या संख्येत घट होत असल्याने निसर्गचक्र सुरळीत चालण्यासाठी साप वाचविणे गरजेचे आहे.आणि ते काम उरण तालुक्यातील वन्य जीव निसर्ग संरक्षण संस्था 2012 पासून करत आहे,आणि 11 वर्ष वन्य प्राणी पक्षी यांच्या बदल उरण तालुक्या प्रमाणे रसायनी परिसरात ही आपल्या पदाधिकारी व सहकाऱ्यांच्या मदतीने जन जागृती, प्रबोधन करत आहे.चिरनेर या इतिहास प्रसिद्ध गावातील विवेक केणी हे या संस्थेचे अध्यक्ष असून चिर्ले गावातील आनंद मढवी हे तरुण सर्प मित्र संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. आज पर्यंत जवळ जवळ विविध जातींच्या 1लाख95हजार सापांबरोबर वन्य प्राणी,पक्षी यांना जीवदान म्हणून वन विभागाच्या माध्यमातून जंगलात सोडण्याचे काम करत आहेत.
या संस्थेचे अध्यक्ष विवेक केण तथा सर्प मित्र यांना विचारणा केली असता साप हा शेतकऱ्यांचा मित्र असून भूतलावरील समतोल राखण्याचे काम विविध जातींचे साप करत आहेत.त्यामुळे त्यांनाही या परिसरात जीवन जगण्याचा अधिकार आहे.परंतु भीती पोटी त्याना मारले जात आहे.त्यामुळे आम्ही वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेच्या माध्यमातून गावा गावात सापां विषयी असणारे गैरसमज दूर करून प्रबोधनाच्या माध्यमातून जनजागृती करत आहोत,तसेच पकडण्यात आलेल्या सापांना तसेच इतर वन्य प्राणी पक्षी यांनाही वन विभागाच्या माध्यमातून जंगलात सोडण्याचे काम करत आहोत.आज पर्यत उरण, जेएनपीटी,आवरे, रसायनी परिसरातून 1लाख 95हजार विविध जातींच्या सापांना वन विभागाचे अधिकारी शशांक कदम,इंगोले साहेब,पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जंगलात सोडून जीवदान दिले आहे. परंतु भीती पोटी त्याना मारु नका,उलट साप दिसला तर आपल्या परिसरातील सर्प मित्रांला यासंदर्भात माहिती द्यावी असे ही आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.तसेच चिर्ले गावातील सर्प मित्र आनंद मढवी,कळबुसरे महेश भोईर, सुरेश म्हात्रे,बापु मोकल, काशिनाथ खारपाटील व इतर सहकाऱ्यांच्या मदतीने आज ओसाड डोंगर भागात वुक्ष संवर्धन हे ही काम वन्य जीव निसर्ग संरक्षण संस्थेच्या माध्यमातून हाती घेतले आहे.
Leave a Reply