ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

नगर पालिका अधिकाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे गरीबाचे संसार उध्वस्त

July 4, 202216:13 PM 21 0 0

जालना(प्रतिनिधी) ः शहरातील खडकपुरा बरवार गल्ली येथे नाल्यांचे काम अवैध पध्दतीने करण्यात आल्यामुळे या नाल्यातील पाणी नागरीकांच्या घराच्या भिंतीमध्ये मुरत असल्यामुळे येथील रहिवाशी दिनेश नंद यांच्या घराची भिंत (ता. 01) रोजी रात्रीच्या सुमारास पडली.
या संदर्भात जालना नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना अनेकवेळा निवेदन देवून या बाबातची माहिती दिली व येथील नालीचे काम करण्याची मागणी केली. मात्र, नगर पालिका प्रशासनाने याकडे दुर्लंक्ष केल्यामुळे चक्क दिनेश नंद यांच्या घराची भिंत दि. 1 जुलै रोजी रात्रीच्या सुमारास पडली.

यामध्ये जिवीत हाणी टळली. मात्र या कुभंकर्णी आवस्थेत झोपणाऱ्या अधिकाऱ्यांनी जे कोणी काम केले त्यांच्या विरूध्द अद्यापही काहीही कारवाई केलेली नसल्याची खंत नंद यांनी व्यक्त केली. तत्कालीन मुख्याधिकारी नार्वेकर यांनी याबाबत गुन्हा दाखल करण्याचे आदेश देखील प्रशासनातील अधिकाऱ्यांना दिले होते. मात्र, या अधिकाऱ्यांनी संबंधीतांसोबत अर्थपुर्ण मैत्री करून या प्रकरणासंदर्भात कुठलीही कारवाई केली नाही. संबंधीत गुत्तेदाराविरूध्द तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील नंद यांनी केली आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *