जालना (प्रतिनिधी) : जालना तालुक्यातील तांदुळवाडी खुर्द येेथे धम्ममूमी बुध्द विहार अंतर्गत सम्राट फार्म हाऊस येथे सोमवार दि. 18 ऑक्टोबर रोजी सकळी 11 वाजता राज्याचे आरोग्यमंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्याहस्ते श्रामनेर शिबीराच समारोप करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन सुधाकर दानवे, बबलु चौधरी, कॉ. सगिर अहेमद रजवी, सुरेश खंडागळे आदींची उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलतांना आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतमबुध्द यांचे जिवनमुल्य समाजाने अंगीकारले तर समाजात कोणतेही दुखः राहणार नाही. तसेच तथागत गौतमबुध्द यांनी सांगीतलेल्या ‘युध्द नको बुध्द हवा’ या संदेशाचे पालन करावे. संपुर्ण जगाला खरोखरच बुध्दांनी अंगिकारलेल्या बोध्द उपासकांची गरज असल्याचे देखील ना. टोपे म्हणाले. याप्रसंगी तांदुळाडी खुर्द येथील बौध्द मुर्तीस पर्यटन स्थळाचा दर्जा मिळून दिल्यामुळे मोहनराव निकाळजे सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर निकाळजे, तांदुळवाडीचे सरपंच अण्णासाहेब चित्तेकर व ग्रामस्थांच्या वतीने ना. टोपे यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी सुरेश खंडागळे, लिंबाजी वाहुळकर, दिनेश आदमाने, रोहिदास गंगातीवरे, राजेश सदावर्ते, प्रकाश घुले, मिलींद खिल्लारे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे आयोजक मोहनराव बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर निकाळजे आणि सरपंच अण्णासाहेब चित्तेकर यांच्यासह या परिसरातील असख्य उपासक व उपासीकांची उपस्थिती होती.
Leave a Reply