ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

अष्टमीतील जिगरबाज तरुणांनी कुंडलिका नदीत बुडणाऱ्याला दिले जीवनदान

August 24, 202117:19 PM 6 0 0

उरण( संगिता ढेरे) रोह्यातील कुंडलिका नदी किनारी दोन मित्रांमध्ये काही कारणास्तव वाद झाला.हा वाद एवढा विकोपाला गेला कि त्यातील एका मित्राने आपल्या दुसऱ्या मित्राचा जराहि विचार न करता निर्दयीपणे त्याला थेट नदीच्या वाहत्या प्रहावात ढकलून दिले.


वाहत्या पाण्यात बुडत असलेला तो तरुण मदतीची याचना करु लागला.म्हणतात ना काळ आला होता पण वेळ आली नव्हती. इतक्यात अडचणीत सापडलेल्या त्या तरुणाच्या मदतीला अष्टमी गावांतील ओंकार सरपाटील व योगेश गोडकीया हे तरुण धावून आले.या तरुणांनी या बुडणाऱ्या व्यक्तीला नदीच्या पात्रातून सुखरूप बाहेर काढले
या दोन बहाद्दुर तरुणांच्या कामगिरी बद्दल संपूर्ण रोह्यातुन त्यांचे कौतुक होत आहे. अष्टमीतील या तरुणांच्या रुपाने त्या बुडणाऱ्या तरुणाला एकप्रकारे जीवनदानच दिले आहे

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *