सध्या देशात महिलांसमोर असलेली आव्हाने त्यामध्ये तिची सुरक्षितता तसेच तिच्यावर होणारे अत्याचार व महत्वाचे म्हणजे सध्याच्या काळात तिला दिली जाणारी वागणूक अशा बर्याच काही गोष्टीना तिला दररोज सामोरे जावे लागते त्यामुळे एक प्रश्न सतत मनात येतो की महिला दिन का म्हणून साजरा करायचा ? तिचे महत्व काय फक्त एकाच दिवसा पुरते असते का ? हे प्रश्न सतत मनाला लागत असतात पण यांचे उत्तर काही सापडत नाही. आपण स्त्रियांना शक्तीशाली बनवत आहोत, की तिला कमी लेखण्याचा प्रयत्न करत आहोत. महिलांनी कायम रडत राहण्यापेक्षा तीने लढत राहायला हवे नियमीत आव्हानां सामोरे जाऊन ती कशी भारी पडते हे बघुन अगदी आत्मविश्वास वाढयला लागेल.
खरेतर महिलांनी मोठ मोठ्या आव्हानावर मात करत यश संपादन करण्याची परंपरा आपल्याकडे पुर्वी पासुन आहे, मग ती सीता असो की द्रौपती ! मुघलांच्या भयंकर आक्रमणाच्या काळात शिवबांवर उत्तम संस्कार करुन स्वराज्याचे स्वप्न बाळगण्याऱ्या जिजाऊ तसेच कर्मठ काळात महिला शिक्षणाची ज्योत पेटवत ठेवण्यार्या सावित्रीबाई फुले व लहान वयात शिक्षण घेऊन सर्वांत प्रथम डॉक्टरांची पदवी घेणार्या पहिला महिला डॉक्टर आंनदीबाई जोशी अशा अनेक महिला होऊन गेल्या आहेत, जितकी नावे घ्यावी तितकी कमीच आहे. यांनी सुध्दा खुप कठोर परिस्थीतींना समोरे जावून परिश्रमातून त्या आपल्या ध्येयापर्यंत पोहचल्या आहे. उलट आतापेक्षा जास्त त्याकाळात महिलांनी प्रचंड सोसले आहे, तरीही त्या खुप हिमतीने सावरत पुढे गेल्या आहे आणि हेच आताच्या महिलांनी लक्षात घेऊन त्यांच्या पाऊल वाटेवर चालण्याचे शिकले पाहिजे, अडचणी आल्या म्हणून रडत बसल्यापेक्षा लढत त्यांनी त्या वर मार्ग शोधले पाहिजे. या शुरवीर महिलांचा वारसा घेवून त्यांनी पुढे गेले पाहिजे तसेच आजच्या काळात असे कोणतेही क्षेत्र नाही ज्यात महिला कमी पडत आहे किंबहुन त्या पुरूषांच्या खांद्याला खांदा लावुन प्रगती पथावर जात आहे. त्यांनी प्रत्येक क्षेत्रात आपले व आपल्या देशाचे नाव उंचावले आहे. त्या अगदी जन्माला येण्यापासून आव्हाने पेलत आहे. त्यातही कधी तरी तीला जगात येणापासून रोखले जाते, तर कधी अनेक बंधने तिच्यावर लादली जातात कधी शिक्षणासाठी संघर्ष, महाविद्यालयात वावरतांना येणारी बंधने, नौकरी नेतृत्व करतांना पुरुषाचा हर्ट होणारा इगो, प्रेम व लग्न निभवण्यासाठी चे आव्हाने, मुला बाळांना उत्तम आयुष्य मिळाव यासाठी तिने केलेल्या तिच्या करियरचे बलीदान तसेच कुटूंबातील समस्या यामुळे तिला किती गृहीत धरले जाते हे लक्षात येवू शकते पण ते . म्हणतात न महिलांकडे सहनशीलता इतकी असते की, तिने ठरविले तर ती काहीही करु शकते.\
नेहमी महिलांच्या आव्हानाबद्दल बोलले जाते व ही आव्हाने जगाने ही पत्कारली आहे, पण त्यावर मात कशी करावी व मार्ग कसा शोधावा यावर कोणी फारस बोलत नाही. आहे ना…. ती घेईन सांभाळून ! असे म्हणत नवऱ्यापासून मुला पर्यंत सगळे जण तिच्यावर निर्धास्त असतात. मात्र, अडचणीच्या काळात वाच्यताही न करता मार्ग काढणारी ही तीच असते त्यामुळे आजही ती शक्तीशाली व सामार्थवान आहे व तिने ठरविले तर ती काहीही करु शकते.
कु. क्रिती राजेंद्र वाणी
न्यु हनुमान नगर, गल्ली नं.04,
प्लॉट न.35, गारखेडा परिसर, औरंगाबाद
Leave a Reply