ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

बुद्ध, धम्म आणि संघ या त्रिरत्नांप्रती श्रद्धा निर्माण व्हावी – भदंत पंय्याबोधी थेरो

January 21, 202214:36 PM 46 0 0

नांदेड – बौद्ध जीवन जगतांना धम्म तत्वज्ञानाशी समरुप व्हावे लागते. जीवनात तथागत बुद्ध, त्यांचा धम्म आणि बुद्धाने निर्माण केलेला संघ यांना फार महत्त्वाचे स्थान आहे. या त्रिरत्नांना अनुसरून मिळालेले मौल्यवान मानवी जीवन पुण्यवान बनवायचे असेल तर बुद्ध, धम्म आणि संघ या त्रिरत्नांप्रती तमाम उपासक उपासिकांमध्ये श्रद्धा निर्माण झाली पाहिजे अशी अपेक्षा तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्राचे संचालक धम्मगुरू भदंत पंय्याबोधी थेरो यांनी दक्षिण नांदेड मतदारसंघातून फिरत असलेल्या धम्मसंदेश व धम्मदान यात्रेदरम्यान जवळा मुक्कामी व्यक्त केली. यात्रेत धम्मगुरू भदंत पंय्याबोधी थेरो यांच्यासह भंते संघरत्न, चंद्रमणी, धम्मकिर्ती, भंते धम्मपाल, श्रद्धानंद, शाक्यपुत्र, सुनंद, सुदत्त, सुयश, शिलभद्र, सुगत, सुजात, सुबोध आणि नवदीक्षित श्रामणेर संघ यांचा समावेश होता.

भंते संघरत्न यांनीही उपस्थितांना धम्मदेसना देतांना कुशल कर्म हा बौद्ध तत्त्वज्ञानाचा केंद्रबिंदू असून आळस हा मुख्य शत्रू आहे, दान पारमिता करुन पुण्यवान बनले पाहिजे याबाबत दैनंदिन जीवनातील उदाहरणे देऊन पटवून दिले.
पौष पौर्णिमेचे औचित्य साधून जवळा द. येथील विश्वशांती बुद्ध विहारात संकल्प गोडबोले यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्राच्या भिक्खू संघाच्या धम्मदेसनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पंय्याबोधी बोलत होते. यावेळी मनपाचे माजी सभापती गणपत धबाले, माजी महापौर दीक्षाताई धबाले, आंबेडकरी साहित्य चळवळीचे अभ्यासक राजपाल चिखलीकर, विपश्यनाचार्य गौतम भावे, रत्नमाला भावे, ज्येष्ठ साहित्यिक अनुरत्न वाघमारे, धम्मसंदेश व धम्मदान यात्रेचे संकल्पक प्रज्ञाधर ढवळे, धम्मसेवक निवृत्ती लोणे, कवी प्रकाश ढवळे नागलगांवकर, सिटी न्युज लाइव्ह संपादक अमोल खिल्लारे, नंदकुमार ससाणे, गौतम लांडगे, वाहेगावचे सरपंच लोभाजी गवारे यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना पंय्याबोधी म्हणाले की, विपश्यना हे बौद्ध जीवनप्रणालीचे अभिन्न अंग आहे. प्रत्येकांनी विपश्यना केली पाहिजे. यामुळे चित्तशुद्धी वाढते. मन एकाग्र होते. मन आणि शरिरातील विविध विकार नष्ट होतात. सृष्टीतील प्रत्येक जैविक तथा अजैविक वस्तूकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. विपश्यना ही धार्मिक नाही. ती प्रत्येकासाठी उपयुक्त आहे, असेही ते म्हणाले.
धम्मसंदेश व धम्मदान यात्रेचे जवळ्यात पदार्पण झाल्यानंतर भंते धम्मपाल, मिलिंद गोडबोले, बाबुराव गोडबोले, ग्रा.पं. सदस्य शंकर गच्चे, कैलास गोडबोले, रोहिदास गोडबोले, आनंद गोडबोले, भैय्यासाहेब गोडबोले, ग्रा.पं.सदस्या शोभाबाई गोडबोले, सरिता गच्चे, माजी सरपंच सुमनबाई गोडबोले, डॉ. सुजाता गोडबोले, इंजि. वनमाला वाळवंटे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशनराव गच्चे, मुख्याध्यापक ढवळे जी. एस., पांडूरंग गच्चे, शिवाजी गच्चे, किशनराव गोडबोले यांच्यासह बौद्ध उपासक उपासिकांनी भिक्खू संघावर पुष्पवृष्टी करीत जोरदार स्वागत केले. त्रिशला गोडबोले, वैजयंता गोडबोले यांच्याकडून भिक्खू संघाला भोजनदान देण्यात आले. संघास रितसर धम्ममंचावर पाचारण केल्यानंतर संघाचे विधिवत स्वागत करण्यात आले. तथागत गौतम बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे दीप धूप आणि पुष्प पूजन झाल्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. सुरेश गोडबोले आणि शालेय विद्यार्थीनींनी केलेल्या याचनेनंतर भिक्खू संघाने उपस्थितांना त्रिसरण पंचशील दिले.‌
विपश्यनाचार्य गौतम भावे यांनी दहा मिनिटे आनापान ध्यानसती हा उपक्रम घेतला. त्यानंतर सप्तरंगी साहित्य मंडळाची ५१ वी काव्य पौर्णिमा संपन्न झाली. त्यात प्रकाश‌ ढवळे, आनंद गोडबोले, अनुरत्न वाघमारे, निवृत्ती लोणे, प्रज्ञाधर ढवळे यांनी सहभाग नोंदवला. प्रा. डॉ. राजपाल चिखलीकर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात सर्व बौद्ध उपासक उपासिकांना भंते धम्मपाल यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या पौर्णिमेचे आयोजक मिलिंद गोडबोले यांच्या परिवारालने भोजनदान दिले तर तिसऱ्या सत्रात रात्री बापूराव जमदाडे शिराढोणकर व कु. नालंदा सांगवीकर यांच्या बुद्ध भीम गीत गायनाचा प्रबोधनपर कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भैय्यासाहेब गोडबोले यांनी केले. सूत्रसंचालन आनंद गोडबोले तर आभार मिलिंद गोडबोले यांनी मानले. दरम्यान, गावातील काही प्रतिष्ठित व्यक्ती सुभाष शिखरे, बाळू शिखरे, बंडू शिखरे, संतोष मठपती, माधव मठपती, राजेश शिखरे, सदाशिव शिखरे, गौस शेख, उत्तम शिखरे यांनी संकल्प गोडबोले या बालकास शुभाशिष देण्यासाठी उपस्थिती लावली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संगिता गोडबोले, साहेब गच्चे, केशव गोडबोले, बालचंद गोडबोले, ग्यानोबा गोडबोले, रमेश गोडबोले, लखन करकडे, अजय गोडबोले, साहेब गोडबोले, विकी गोडबोले, समाधान लोखंडे, ईश्वर गच्चे, अमोल गोडबोले, पुरभाजी गोडबोले, रत्नदीप गच्चे, स्वागत गच्चे, अभिमान गच्चे, विनोद गोडबोले, राष्ट्रपाल गच्चे, विशाल पंडित, अविनाश हिंगोले, श्रीरंग गच्चे, सिद्धार्थ गोडबोले, वैशाली गोडबोले, विमलबाई गोडबोले, सुमनबाई गोडबोले, कांताबाई गोडबोले, सुंदरबाई गोडबोले, सारिका गोडबोले, माया गोडबोले, सिताबाई करकडे, लक्ष्मीबाई गच्चे, नंदा गोडबोले, करुणा गच्चे, उषाताई हटकर, मायादेवी गोडबोले, निर्मला गोडबोले, वेणुताई गोडबोले, वच्छला गोडबोले, ज्योती झिंझाडे, सुमनबाई सुभाष, वंदना गोडबोले, आम्रपाली गोडबोले, विशाखा गोडबोले, अनिता गोडबोले, रमाबाई भीमराव गोडबोले, रमाबाई रोहिदास गोडबोले, माधव गोडबोले, रावण गोडबोले, कमलबाई गच्चे, मालताबाई गच्चे, सुलोचना गच्चे, सुनिता गच्चे, ललिता गच्चे, सुशिला गोडबोले, कांचन गोडबोले, वंदना गच्चे, पुष्पा गोडबोले, चौतराबाई गोडबोले, सुनिता हिंगोले, रेखा गच्चे, संगीता गोडबोले, मोखिंद गोडबोले, विकास गोडबोले आदींनी परिश्रम घेतले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *