ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जालना येथील शासकीय स्त्री रुग्णालयात चोरट्यांचा सुळसुळाट; रुग्णांच्या नातेवाईकांच्या मोबाईल, पॉकेट ,सोन्याच्या लॉकेटवर डल्ला.

July 5, 202112:28 PM 77 0 0

कैलास गजर 
जालना/प्रतिनिधी : जालना चमन येथील शासकीय महिला व बालरुग्णालयात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून दिनांक : (1) च्या मध्यरात्री दोनच्या सुमारास रुग्णासोबत आलेल्या नातेवाईकांच्या खिशातील मोबाईलसह गळ्यातील सोन्याचे लॉकेट, रोख रक्कम, पॉकेटमधील महत्वाची कागदपत्रे घेऊन अंधाराचा फायदा घेऊन पळ काढला. रुग्णालय प्रशासनाला विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन हात वर केले.रुग्णालयात सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह अपुरी सुरक्षाव्यवस्था असल्याने रुग्णालय प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. त्यामुळे रुग्ण व नातेवाईकांची सुरक्षा भगवान भरोसे असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त होत असून रुग्ण नातेवाईकांनी कदीम पोलीस ठाणे जालना येथे अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर माहिती अशी की राजूर येथील अर्जुन नाना पंडित हे आपल्या पत्नीला घेऊन डिलिव्हरीसाठी जालना येथील शासकीय महिला व बालरुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.पंडित यांचे काही नातेवाईक रात्रीचा जेवणाचा डबा घेऊन आले परंतु उशीर झाल्याने व गावी परत येण्यासाठी बस नसल्याने नातेवाईकांनी रात्रभर रुग्णालयात आराम करून सकाळी गावी जाण्याचे ठरले.

त्यादिवशी रुग्णास दाखल करताना दिवसवसभर धावपळ सुरू होती.त्यामुळे रात्री जेवण केल्यानंतर पंडित व त्यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयातील नोंदणी विभागासमोर अंग टाकल्या बरोबर झोप लागून गेली.या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी सत्यविनायक भगवान पंडित यांचा मोबाईल, सोन्याचे लॉकेट,पॉकेटमधील कागदपत्रे व रोख रक्कम १९००रुपये, तसेच शुभम सुपडू वरपे,अंकुश दत्तू करपे यांचे मोबाईल ,पॉकेटमधील कागदपत्रे व रोख रक्कम, अशी एकूण १९९०० रुपयांची चोरी करून चोरटे पसार झाले.

सकाळी उठल्यावर पाहिले असता वरील तिघांच्याही खिशातील मोबाईल, पॉकेटमधील कागदपत्रे, सोन्याचे लॉकेट आणि रोख रक्कम गायब झाल्याचे दिसून आले. नातेवाईकांनी घडलेला प्रकार कुणाला न सांगता जालन्यातील इतर नातेवाईक यांच्याकडून तिकिटासाठी पैसे घेऊन राजूरला निघून आले.

राजूरमध्ये आल्यानंतर त्यांनी आपल्या सोबत घडलेला प्रकार सामाजिक कार्यकर्ते प्रा. बाळासाहेब बोराडे यांना सांगितला. प्रा.बोराडे यांनी क्षणाचाही विलंब न करता परत रुग्णांच्या नातेवाईकांना सोबत घेऊन शासकीय रुग्णालय गाठले. रुग्णालयाचे प्रशासक डॉ. धसाळ साहेब यांना घडलेला प्रकार सांगितला. रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर जाब विचारला. रुग्णांच्या नातेवाईकांचे आर्थिक नुकसान झाले त्यास जबाबदार कोण असा प्रश्न केला. रुग्णालयात तुटपुंजी सुरक्षा व्यवस्था असल्याने असे प्रकार घडत आहेत. चोवीस तास सुरक्षा रक्षक आणि संपूर्ण परिसर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणी खाली आणावा अशी मागणी प्रा.बोराडे यांनी केली.एवढ्यावर न थांबता रुग्ण नातेवाईकांना सोबत घेऊन कदीम पोलीस स्टेशन जालना येथे अज्ञात चोरट्यांच्या विरोधात तक्रार देऊन गुन्हा दाखल करण्यात आला.पुढील तपास कदीम जालना पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक महेश टाके यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नपारखे साहेब व दीपक भाऊराव दाभाडे हे करीत आहेत.
प्रतिक्रिया :

जालना येथील शासकीय स्त्री रुग्णालयात माझ्या पत्नीला डिलिव्हरीसाठी दाखल केले होते. रात्री उशिर झाल्याने मी व माझे नातेवाईक रुग्णालयातील नोंदणी विभागासमोर झोपलो होतो. रात्री एक ते दोनच्या दरम्यान चोरट्यांनी नातेवाईकांचे तीन मोबाईलसह रोख रक्कम,सोन्याचे लॉकेट, पॉकेटमधील कागदपत्रे घेऊन पसार झाले.अज्ञात चोरट्यांविरुद्ध कदीम पोलीस स्टेशन जालना येथे गुन्हा दाखल केला आहे.

अर्जुन पंडित , रुग्ण नातेवाईक, राजूर

रुग्णालय अधीक्षक प्रतिक्रिया

जिल्हा महिला व बाल रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांची तक्रार लक्षात घेता सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात येईल.सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी उच्चस्तरावर मागणी केली आहे. प्रशासनाकडून मान्यता घेऊन सुरक्षारक्षकासह रुग्णालय परिसरात कॅमेरे बसवले जातील.रुग्ण सुरक्षेला प्राधान्य दिले जाईल.

डॉ.राजेंद्र पाटील,अधीक्षक ,शासकीय स्त्री रुग्णालय जालना

महिला रुग्णालयात वारंवार चोऱ्यांचे प्रकार समोर येत असतील तर सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. ग्रामीण भागातील रुग्णांची चोरत्याकडून लूट होत आहे. त्यामुळे नातेवाईकांच्या मनात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. सीसीटीव्ही व सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात यावी.दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी.

प्रा.बाळासाहेब बोराडे ,सामाजिक कार्यकर्ते, राजूर

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *