ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

हे सरकार जनसामान्यांच्या हिताचे निर्णय घेवून महाराष्ट्राचा विकास करणार- ना. रविंद्र चव्हाण

August 30, 202217:18 PM 10 0 0

उरण (संगिता पवार ) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन केलेले सरकार जनसामान्यांच्या हिताचे निर्णय घेवून महाराष्ट्राला विकासाच्या दिशेने निश्चित घेवून जाईल असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी उरण, जेएनपीटी येथे सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात केले. नवीन स्थापन झालेल्या युती सरकारमध्ये रविंद्र चव्हाण यांना सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री म्हणून जबाबदारी दिल्यानंतर त्यांचा उरण भाजपाच्या वतीने माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विविध पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.

रविंद्र चव्हाण हे पुढे बोलताना म्हणाले, महाविकास आघाडीच्या सरकारने महाराष्ट्राला मागे नेण्याचे काम केले. नव्याने आलेले युतीचे सरकार हे दोन इंजिनचे सरकार असून महाराष्ट्राचा विकास हा झपाट्याने होईल. नरेंद्र मोदी यांनी देशात विकासाची गंगा आणली आहे. देशातील गोर-गरीबांसाठी जनतेसाठी नरेंद्र मोदी यांनी 243 योजना सुरू केल्या आहेत. त्याचा लाभ देशातील करोडो जनतेला घेता येतो. गरीबांसाठी अंत्योदय योजना, शेतकऱ्यांना अर्थिक मदत व्हावी यासाठी शेतकरी सन्मान योजना,गरीब महिलांसाठी उज्वला योजना या सारख्या गोरगरीबांचा हिताच्या योजना राबविल्या. देशातील लोकांना स्वच्छतेचे महत्व पटवून देवून स्वच्छ भारत योजना सूरू केल्याचे सांगितले. मोदी यांच्या नेतृत्वामुळे जगात भारताचे नाव उंचावले असल्याचे सांगून त्यासाठी देशातील जनतेने नरेंद्र मोदी यांच्या पाठी उभे राहण्याची गरज आहे असे त्यांनी सांगितले. तसेच ज्या कार्यकर्त्यांनी भाजपा मध्ये प्रवेश केला आहे त्यांचा कधीही भ्रम निरास होवू देणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमात बोलताना रामशेठ ठाकूर यांनी देखिल रविंद्र चव्हाण यांची मनसोक्त स्तूती केली. रविंद्र चव्हाण हे अत्यंत विनम्र व्यक्तिमत्व असून गर्व नसलेला या कार्यकर्त्याला मंत्रीपदी बसविल्यामुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यात विकासाची कामे करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी भाजपाचे उरण मतदार संघाच्या आमदार यांच्या कार्याचे देखिल कौतूक केले. तर आमदार महेश बालदी यांनी आपल्या भाषणात रविंद्र चव्हाण यांच्यासारखी माणसे सोबत असल्याने या भागाची कामे निश्चित मार्गी लागतील असे सांगितले. नितिन गडकरी यांच्या प्रयत्नांमुळे या भागात कोट्यावधी रूपयांची कामे करण्यात आली आहेत. त्यांच्या संकल्पनेतून उभारण्यात येत असलेल्या जेएनपीटी सेझ मध्ये येथिल स्थानिक प्रकल्पग्रस्त लोकांना लवकरच मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार असल्याचे सांगून. येत्या निवडणूकीत मी केलेल्या कामांमुळे 50 हजार पेक्षा जास्त मताधिक्क्यांनी निवडून येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांचे देखिल भाषण झाले.

या सत्काराच्या कार्यक्रमात शिवसेनेचे नवघर जि.प. मतदार संघाचे सदस्य विजय भोईर आणि विजय विकास सामाजिक संस्थेचे विकास भोईर, धूतूम ग्रामपंचायतीच्या सरपंच रेश्मा ठाकूर, उपसरपंच शरद ठाकूर आणि सदस्य, जासई ग्रामपंचायत सदस्य बळीराम घरत, उद्योजक देवेंद्र पाटील, आवरेचे धनेश गावंड, सांगूर्लीचे माजी सरपंच राजेंद्र माटे, गोवठणे गावच्या उपसरपंच कविता म्हात्रे, आपटा ग्रामपंचाय सदस्य असद पटू, संदिप मुंडे, सागर देशमुख, चंदन घरत, हेमानंद पाटील, धनराज कोळी, गिरिष कोळी यांच्यासह शेकडो शिवसेना, काँग्रेस, शेकापच्या कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे म्हणून रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, पनवेल तालुका अध्यक्ष अरूण भगत, उरण तालुका अध्यक्ष रवि भोईर, खालापूर तालुका अध्यक्ष रामदास ठोंबरे, माजी जि.प. सदस्य ज्ञानेश्वर पाटील, विजय भोईर, विकास भोईर आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपा वाहतूक विभागाचे सुधिर घरत यांनी केले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *