संपूर्ण जग आज कोरोना ह्या विषाणूच्या विळख्यात सापडलेले आहे. गेल्या वर्षभरापासून आपन सर्व ह्या महामारीच्या आजाराने ञस्त झालेलो आहोत. अर्थ व्यवस्था डबघाईस गेलेली आहे. बेरोजगारीने समस्त लोकजीवन अडचणीत सापडलेले आहे. शासकीय स्तरावरून ह्या विषाणूला रोखण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न केले जात आहेत. लॉकडाऊन, कर्फ्यू, नियमावली, आरोग्यविषयी जनजागृती केली जात आहे.
या सर्व ऊपायांनी माणसे अक्षरश: हवालदिल झालेली आहेत. कुणाचे ऊद्योगधंदे बुडाले, तर कुणी बरबाद झालेले बघायला मिळत आहे. आत्महत्या सारखे प्रकारही या काळात आपनाला पाहताना मिळत आहेत. गेल्या दोन तीन महिन्यापासून सरकारी स्तरावर लसीकरनाचे प्रयोग मोठ्या प्रमाणावर राबवून ह्या रोगाविरूद्ध लढनारी रोगप्रतिकार शक्ती वाढविणारी औषधी दिली जात आहेत. मागच्या वर्षीच्या कोरोनापेक्षा ह्या वर्षीचा कोरोना आजार जास्त घातक ठरू लागलेलाआहे. महाराष्ट्रात आजकाल दरदिवशी अंदाजे साठ हजारापर्यत रूग्ण आढळत आहेत. मृत्यूचे प्रमाणही दरदिवशी दिड हजाराच्या आसपास आहे. देशाच्या इतर राज्यातही ही स्थिती वरखाली वाढताना दिसत आहे. डबल म्युटेशन धारन केलेला हा आजार चिंतेची बाब ठरू लागला आहे. मधल्या काळात मिळालेल्या मोकळीकीमुळे थोडा सैलपणा आला होता, तोच घातक ठरू लागलेला आहे. जनजीवन सुरळीत होण्याची चिन्हे दूरदूर पर्यत कुठेही दिसत नाहीत. पुन्हा कडक लॉकडाऊनचे संकट देशावर घोंगावू लागलेले आहे. तेव्हा आपापल्या रोजीरोटीचे प्रश्न कसे सोडवायचे, हा एकच प्रश्न सध्या जनमाणसात आहे. तरीही सरकार आणि समाज यांच्या संयुक्त माध्यमातून प्रयत्न करून आपल्याला हा सध्याचा काळ सुरक्षितपने जीवंत राहून निभावून न्यायचा आहे. कारण ऊद्याच्या जगण्यावर विश्वास ठेवून, जगणं सुंदर करायचं आहे. आयुष्याला पैलतिरी घेऊन जायचं आहे. ह्या महामारीतून आपण स्वत:ला वाचवून घ्यायचं आहे. प्रशासनाला सहकार्य करायचं आहे. सरकार प्रयत्नशील आहेच. तेव्हा कुठेही गाफील न राहता ही कोरोना विषाणुविरूद्धची लढाई आपन जिंकूया. कारन आजची ही झुंज नाही, ही ऊद्याची हातघाई, असं म्हणावसं वाटतं…
आयु साऊल झोटे
मो. नं : 8329280166
Leave a Reply