खालापुर:- खालापुरातील तांबाटी येथे झालेल्या शिवसेनेच्या सर्वसाधारण सभेत तांबाटी गावातील शेकडो ग्रामस्थांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. आमदार महेंद्र थोरवे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले, या विभागातील कारखानदारीतील स्थानिक भरती बाबत त्यांनी अनेकांचे कान उपसले व सज्जड दम ही दिला व ” हीच ती खरी वेळ ” म्हणत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थानच्या निवडणुकीत शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आणि शिवसैनिकांना कामाला लागा असे आदेश दिले. खालापुरात तांबाटी येथे आज शिवसेनेची सर्वसाधारण सभा पार पडली आणि अनेक कारणांनी ही सभा वादळी ठरली. तांबाटी गावातील भाजप व अन्य पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आणि ग्रामस्थांनी आज या सभेदरम्यान शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.स्थानिक कामगार भरती बाबत आमदारांनी अनेकांचे कान उपसत सज्जड दम ही दिला. तर आघाडीचे सरकार असल्याने याठिकाणी पालकमंत्री राष्ट्रवादी चा असल्याने त्यांच्याकडून शिवसैनिकांची गळचेपी केली जाते असा आरोप करीत आमदार महेंद्र थोरवे यांनी पालकमंत्री अदिती तटकरे यांच्यावर टीका केली. आणि राज्यात शिवसेनेचे सरकार आहे तालुक्यात आपली ताकद आहे त्यामुळे आपल्याला येथे आघाडीची गरज नाही असे सांगत आगामी निवडणुका स्वबळावर लढवण्याची घोषणा त्यांनी केली.
या सभे दरम्यान तांबाटी गावातील शेकडो तरुण, महिला व ग्रामस्थ यांनी भाजप व इतर पक्षांना सोडचिठ्ठी देत शिवसेनेचा भगवा हाती घेतला. कोरोना महामारीच्या दीड दोन वर्षांच्या कालावधी नंतर सेनेची एवढी मोठी सभा झाली. तांबाटी गावात वातावरण भगवे झाले होते. नविनदादा घाटवळ, गोविंद बैलमारे यांनी आपला जुना अनुभव कथन करीत शिवसैनिकांना ऊर्जा देण्याचे काम केले. या बैठकीत प्रामुख्याने तांबाटी ग्रामपंचायती सह तालुक्यात असणाऱ्या औद्योगिक वसाहतीत सुरू असलेल्या स्थानिक कामगार भरती बाबत मुद्दे उपस्थित झाले. त्यामुद्यांवर बोलताना आमदारांनी नाव न घेता सेनेच्या अनेक पदाधिकारी, लोकप्रतिनिधींचे अक्षरशः कान उपसले. अनेक कंपन्यांचे अधिकारी त्यांना हाताला धरून स्थानिक भूमिपुत्र व नागरिकांना नोकऱ्या देत नाहीत असे आमदारांनी सांगितले. आणि आता कोरोना संकट टाळले असल्याने कंपनी प्रशासनास त्यांनी इशारा दिला की तालुक्यातील गोदरेज , टाटा सारख्या मोठ्या कंपनीत जर स्थानिकांना न्याय नाही मिळाला तर शिवसेना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.
राज्यात आघाडी चे शिवसेनेचे सरकार आहे व आपल्या मतदार संघात आपली चांगली ताकद आहे. तसेच पक्षही जोमाने वाढत आहे असे असताना आपण कोणाबरोबर आघाडी का करायची त्यामुळे आगामी होणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थानच्या निवडणुका आपण स्वबळावर लढणार आहोत असे त्यांनी जाहीर केले.
Leave a Reply