ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

… ही पॉझिटीव्ह महिला ठरत आहे कोरोना रुग्णांसाठी वरदान; पॉझिटीव्ह नाही तर निगेटीव्ह आहे ती… आणि निगेटीव असतांनाही पॉझिटीव्ह आहे ती…

May 14, 202119:07 PM 112 0 2

अच्युत मोरे
जालना – कोरोनाने देशभरात थैमान घाले आहे. या कोरोनामुळे अनेकजन निगेटीव्ह भुमीका घेऊन जगत आहेत. भिती आणि दडपणाखाली अनेकजन दिवस काढत आहेत. कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर त्या रुग्णांच्या जवळ जाणे तर सोडाच साधे रुग्णांच्या परिवाराला बोलायलाही घाबरतात लोक. परंतु जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात कक्ष सेवीका म्हणून काम करणारी सुनिता अरुण जाधव या सर्वांसाठी आदर्श ठरल्या आहेत. त्या स्वतः निगेटीव्ह असतांनाही विचाराने पॉझिटीव्ह असल्यामुळे कोरोना रुग्णांच्या वार्डातील स्वच्छतेसह असहाय्य रुग्णांना प्रेमाणे घास भरवून त्यांची मनोभावे सेवा करीत आहेत. अत्यंत सिरीयस असलेल्या एका वृध्द महिला रुग्णास स्ट्रेचर न मिळाल्याने सुनिताने स्वतः हातावर पेशंट घेऊन आय सी यु मधे नेऊन सोडले. त्या पेशंटची जेवना पासून ते पिण्याच्या पाण्या पर्यंत सर्व काळजी घेतली. आज ते पेशंट ठण-ठणीत बरे होऊन सुट्टी घेऊन आपल्या घरी गेले आहे. अशा अनेक कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांचे मनोबल वाढवून त्यांना हिंम्मत देणार्‍या सुनिता जाधव चर्चेत आल्या आहेत. त्यामुळे पॉझिटीव्ह विचाराने कोरोनाचा सामना धिराने करा, धिर खचू देऊ नका असेच म्हणता येईल.

देशात कोरोन रुग्णांची झपाट्याने वाढ होत आहे. सरकारने अनेक दिवसापासून लॉकडाऊन जाहिर केला आहे. या कोरोनाने कुणाचा बाप हिरावून घेतलाय तर कुणाची आई, कुठे भावापासून बहिण हिरावली तर कुठे बहिणीचा भाऊ, काहींचा उद्याचा आधार कोरोनाने हिरावला आहे तर काही तान्हुले आई-बापा विना पोरके झाले आहेत. कुणाची बायको सोडून गेलीय तर कुणाचा नवरा सोडून गेलाय, अनेकांनी रस्त्यात तडफडून जिव सोडला तर काही मृत्युशी झुंज देत आहेत. जे बाधीत झाले ते कोरोना सोबत दोन हात करीत आहेत. काहिंनी हिंम्मत हारली आहे तर काही हिंम्मतीने कोरोनाला हरवित आहेत.
कोरोना सोबत दोन हात कसे करावे याचे उदाहरणच सुनिता जाधव यांच्या माध्यमातुन अनेकांना पहायला मिळत आहे. एके दिवसी एक वयोवृध्द महिला रुग्ण उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाली. तिला अति दक्षता विभागात उपचारासाठी हलविण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यावेळी स्ट्रेचर लागणार होते, परंतु इतर रुग्णांच्या सिफ्टींगसाठी स्ट्रेचर नेल्याने आयत्या वेळी स्ट्रेचर उपलब्ध झाले नाही. महिलेला तर तात्काळ आयसीयु मध्ये दाखल करणे अत्यंत गरजेचे होते. त्यामुळे सुनिता जाधव यांनी कोणताही विलंब न करता वृध्द महिलेस तळ हातावर घेऊन थेट आयसीयु मधे नेले. तीथे वृध्द कोरोना महिलेवर उपस्थित डॉक्टरांनी योग्य उपचार केले तर सुनिता जाधव यांनी त्या रुग्णाची मनोभावे सेवा केली. या रुग्णांसह अनेक रुग्णांना रोज पाणी पाजणे, सरकलेले ऑक्सिजनचे मास्क व्यवस्थित लावणे, रुग्णास स्वतःच्या हाताने खायला देणे यासह रुग्णाची आवश्यक ती सेवा सुनिता जाधव यांनी केली आणि अजुनही करत आहेत. डॉक्टरांच्या औषधोपचाराने आणि सुनिता जाधव यांनी केलेल्या चांगल्या सेवेमुळे कोरोना रुग्ण ठण-ठणीत करे झाले आणि कोरोनावर मात करुन घरी परतले. सुनिता जाधव यांनी केलेल्या सेवेबद्दल कोरोना रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांनी त्यांचे आभार मानले.

सुनिता जाधव यांचा सत्कार


त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक आणि कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांनी दिलेल्या चांगल्या प्रतिक्रिया यामुळे सुनिता जाधव यांचा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सौ. अर्चना भोसले, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. घोडके यांनी सुनिता जाधव यांचा सत्कार करुन त्यांच्या कामाचे कौतुक केले.

 

अशा कर्मचार्‍यांमुळे रुग्णांचे मनोबल वाढते – सौ. रसना देहेडकर


कोरोना रुग्णांचे मनोबल वाढवायचे असेल तर सुनिता जाधव यांच्यासारख्या कर्मचार्‍यांची नितांत गरज आहे. या लोकांमुळे कोरोना रुग्णांना हिंम्मत मिळते आणि त्यांच्यात मनोबल वाढते, त्यांच्या वाढलेल्या मनोबलामुळे रुग्ण बरा होण्यास मदत होते. त्यामळे अशा कर्मचार्‍यांची रुग्णांना आणि रुग्णालयांना नितांत गरज असल्याचे मत ह्युमन राईट्स ऑर्गनायझेशनच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा तथा सामाजीक कार्यकर्ता सौ. रसना देहेडकर यांनी व्यक्त केलेे आहे.

आम्हाला सुनिता जाधव यांचे मोलाची मदत – रुग्णांचे नातेवाईक

कोरोना रुग्ण यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर जे जे रुग्ण आणि रुग्णांचे नातेवाईक सुनिता जाधव यांच्या संपर्कात आले त्यांना त्यांना मोलाची मदत सुनिता जाधव यांनी केली. शिवाय त्यांची सेवा करुन त्यांचे मनोबल वाढवणे व त्यांना धिर देण्याचे काम त्या करतात. त्यामुळे त्यांचे खुप उपकार असल्याच्या भावना अनेक रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांनी व्यक्त केल्या आहेत. ज्या पेशंटचे नातेवाईक पेशंट पर्यंत जाऊ शकत नाहीत अशा रुग्णांना त्या स्वतः अन्न, पाणी, मास्क व्यवस्थित लावणे यासह सर्व सेवा त्या करीत असतात. आम्हाला व आमच्या नातेवाईकांना केलेली मदत आम्ही कधीच विसरु शकत नाहीत. त्यांचे झालेले मोलाचे सहकार्य आणि दिलेला धिर यामुळे आमचे मनोबल वाढले आणि आम्हाला कोरोनावर मात करता आली अशा भावना कृष्णा डांगे, जालींदर बिल्लोरे, डिगांबर सुरंकर यांनी व्यक्त केल्या आहेत.

 

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *