उरण ( संगिता पवार ) :देशाच्या स्वातंत्र्यासाठी सविनय कायदेभंगाच्या चळवळीत, उरण तालुक्यातील चिरनेर येथे 25 सप्टेंबर 1930 रोजी आक्कादेवीच्या माळरानावर इंग्रज सत्तेविरुद्ध झालेल्या लढ्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूरवीर हुतात्म्यांच्या स्मूतीदिन कार्यक्रमावर मागील वर्षीप्रमाणे यंदाही कोरोनाचे सावट आहे. त्यामूळे हा कार्यक्रम अतिशय सध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार असल्याची माहिती चिरनेर ग्रामपंचायतीचे ग्रामवीकास अधीकारी महेश पवार यांनी दिली आहे.
या रणसंग्रामात धाकू गवत्या फोफेकर ,नाग्या महादू कातकरी दोघेही – चिरनेर,आलू बेमट्या म्हात्रे – दिघोडे, आनंदा माया पाटील – धाकटी जुई,रामा बामा कोळी – मोठीजुई,मोरेश्वर रघुनाथ शिंदे(न्हावी) – कोप्रोली,परशुराम रामा पाटील – पाणदिवे व हसुराम बुद्धाजी घरत – खोपटे या आठ शूरविरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी जुलमी ब्रिटिश सत्ते विरोधात आक्कादेवीच्या माळरानावर उरण मधील जनतेने केलेल्या जंगल सत्याग्रहात हौतात्म्य पत्करले होते. दरवर्षी चिरनेर येथे रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आणि चिरनेर ग्रामपंचायतीच्या वतीने हुतात्म्यांच्या नातेवाईकांचा व स्वातंत्र्य सैनिक आणि जखमींच्या नातेवाईकांचा यथोचित सत्कार व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात येतो. मात्र यंदाही कोरोनामूळे शासकीय निर्बंधांचे पालन करीत अधिक गर्दी न करता हुतात्मा स्तंभ आणि शिलालेख यांनी पुष्पचक्र आणि पुष्पहार अर्पण करून पोलिसांची शासकीय सलामी देऊन कार्यक्रम कोणत्याही प्रकारे गाजावाजा होणार असल्याची माहिती चिरनेर ग्रामपंचायतीचे ग्रामवीकास अधीकारी महेश पवार यांनी दिली आहे.
Leave a Reply