काट्यांनी डंख केला म्हणुन फुलांना कुरवाळाणं सोडायचं नसतं,.त्याला आपली ओंजळ देवुन उबेची कुस द्यायला हवीच.का?म्हणुन आपण आपला मुळ गुणधर्म सोडायचा…
नियतीने तिच्या व्यवहाराशी चोखपणा दाखवलाच तर,आपलं त्याप्रती बदलणं कितपतं योग्य?हे आपणच पडताळायला हवं,जीवनात असणार्या उणीवांचे विषाद न बाळगता,नियतीने बहाल केलेल्या अमूल्य दातृत्वाविषयी कृतज्ञता बाळगावी,सकारात्मकता जीवनात असली की सगळ्या गोष्टी नक्कीच सफल होतात..नकारात्मकता माणसाचं जगणं कठीण करून टाकते त्या विरुद्ध सकारात्मक ता माणसाला संकटातून मार्ग दाखवते, संकटंकडे तसेच परिस्थिती कडे पाहण्याचा दृष्टिकोन व्यवस्तीत असला तर संकटे सुद्धा संधी च्या स्वरूपात दिसतात. एखाद्या विशिष्ट परिस्थिती माणसाला गोंधळात टाकते, पण पाहिले असता त्याच परिस्थिती माणसाला काही तरी गोष्टी शिकवण्यासाठी आलेल्या असतात.प्रत्येक परिस्थिती मध्ये मेंदूला इतकं मजबूत बनवा की त्याला नकारात्मक विचारांनी घेरलच पाहिजे नाही. आणि घेरलही तरी त्या परिस्थिती मध्ये सकारात्मक विचार करणे आणि त्या नकारात्मक परिस्थिती मधून बाहेर पडण्यास स्वतःचे सहकार्य करणे
प्रत्येक परिस्थिती मध्ये आपला दृष्टीकोन कसा असायला हवा ते एका उदाहरणावरून पाहूया, एका ग्लास मध्ये थोडस पाणी आहे यावरून आपण काय समजू शकतो, एक दृष्टिकोन असा की ग्लास अर्धाच भरलेला आहे, आणि एक दुसरा दृष्टिकोन म्हणजे पाणी थोडस च आहे पण इतकं पाणी तहानलेल्या साठी पुरेस आहे. तसेच कोणाचा जीव वाचण्यासाठी एवढही पाणी पुरेस आहे. याच दृष्टिकोनातुन आपण जीवनाकडे सकारात्मक पाहायला हवं
प्रा. सारीका बकवाड
Leave a Reply