ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

छत्रपतींना धमक्या?, धमकी आली तर मला काहीच करावं लागणार नाही; धमकी देणाऱ्यांना संभाजी छत्रपतींचा सूचक इशारा

February 26, 202214:18 PM 45 0 0

मुंबई: छत्रपतींना धमक्या? मला धमक्या आल्या तर मला काहीच करावं लागणार नाही. माझा फक्त छत्रपती घराण्यात जन्म झाला आहे. कोट्यवधी पाईक आहेत की, असा सूचक इशारा खासदार संभाजी छत्रपती यांनी आज धमक्या देणाऱ्यांना दिला आहे. संभाजी छत्रपती यांनी मराठा समाजाच्या उन्नतीसाठीच्या सात मागण्या मंजूर व्हाव्यात म्हणून आजपासून उपोषण सुरू केलं आहे. त्यावेळी त्यांना आलेल्या धमक्यांबाबत विचारले असता संभाजीराजेंनी आश्चर्य व्यक्त केलं. तसेच धमक्या देणाऱ्यांना सूचक इशाराही दिला आहे. यावेळी त्यांनी सातही मागण्यांबाबत सरकारकडून कशी निराशा झाली याची माहितीही त्यांनी दिली. तसेच सरकारने शब्द पाळला नाही. त्यामुळेच आपल्याला उपोषण करण्याची वेळ आल्याचंही त्यांनी सांगितलं. तसेच उपोषणाचा इशारा दिल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांचे आपल्याला फोन आले होते. पण प्रवासात असल्याने त्यांच्याशी बोलणं झालं नाही, असं संभाजी छत्रपती यांनी स्पष्ट केलं.
खासदार संभाजी छत्रपती यांनी आज पुन्हा सात मागण्यांवरून सरकारला धारेवर धरले. अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाला निधी देण्याचं आश्वासन दिलं. पण हा निधी मिळाला नाही. सारथीमध्ये मुव्हमेंट सुरू झाली. पुणे आणि कोल्हापुरात सारथीचं केंद्र सुरू झालं. पण आठ महिने झाले. तिथे कोर्सेस सुरू नाही. अतिरिक्त स्टाफ नेमला नाही. जागा हस्तांतर झाली नाही. एक एकरची जागा पाच एकर करायची होती ती झाली नाही. मग मी लढाई करायला नको का? सारथीला 500 कोटी रुपये द्यावे ही आमची मागणी होती. त्यावेळी अजित पवार म्हणाले 500 कोटीची मागणी केली अन् 51कोटी खर्च झाले तर पुढच्यावर्षी 51 कोटीच मिळतील. त्यांनी सांगितलं प्लानिंग करू. जेवढा खर्च होईल तेवढा देऊ, असं सांगितलं. आम्ही त्याला मान्यता दिली. पण त्याची ब्ल्यू प्रिंट अजूनही तयार झाली नाही, असं संभाजी छत्रपती म्हणाले.
14 ऑगस्टला 13 वसतिगृह सुरू करू असं सरकारने सांगितलं. त्यातील एकही वसतिगृह सुरू झालेलं नाही. ठाण्यात एक सुरू झालं आहे. पण ते एकनाथ शिंदे यांनी स्वत:च्या बळावर सुरू केलं आहे. तुम्ही किती वसतिगृह सुरू केले? असा सवालच त्यांनी सरकारला विचारला.
कुंभकोणी महा कुंभ आहेत
मराठा आंदोलनातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं होतं. पण अजून गुन्हे मागे घेतले नाही. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या मुलांचा विषय होता. त्यांचं सिलेक्शन झालं त्यांना अजून नियुक्त्या नाही. कोर्टाचा संबंध नाही. ते म्हणतात कोर्टाच्या निर्णयाचा भंग होईल. मला माहीत नाही काय भंग होईल. कुंभकोणी महा कुंभ आहेत, असा चिमटा त्यांनी काढला.
मी महाराजांचा वंशज आहे. हा लढा मी लढायलाच हवा. हा माझा निर्णय आहे. एक मागासवर्गीय आयोग असतांना, मराठा समाजासाठी स्वतंत्र आयोग स्थापन करण्याची कायद्यात घटनेत तरतूद नाही. उगाच समाजाला दिशाभूल करू नये, असंही ते म्हणाले. यावेळी त्यांनी बाळासाहेब थोरात यांच्या विधानावरही प्रतिक्रिया दिली. मी राजकारणात नवखा आहे. ते दिगग्ज आहेत. कसं वागायचं हा सल्ला आता त्यांनीच द्यावा, असा चिमटा त्यांनी काढला.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *