ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

कंटेनर चोरी प्रकरणी अभिजित घरत सह तीन आरोपींना अटक व सुटका

August 20, 202115:05 PM 8 0 0

उरण( संगिता पवार ) दोन कंटेनर चोरी प्रकरणी उरण पोलीसांनी अभिजित सतिश घरत सह इतर तीन आरोपींना अटक केली आहे.सदर आरोपींना उरण न्यायालयात हजर केले असता जामिनावर त्यांची सुटका करण्यात आली आहे.परंतु उरण तालुक्यात वारंवार कंटेनर मधिल मालाची व रिकाम्या कंटेनरची चोरी होत असल्याने उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी ए पी आय कैलास गवते हे अधिक तपास करत आहेत.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उरण तालुक्यातील जांभूळपाडा येथील जे.एम.जे.सेेल्युसेंन या कंटेनर यार्ड मधून २६ मे २०२१ रोजी दोन कंटेनर चोरीस गेल्याची घटना घडली होती.सदर कंटेनर चोरी प्रकरणी उरण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असता तपास अधिकारी ए पी आय कैलास गवते यांनी उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला.सदर चोरी प्रकरणी चेतन रविंद्र भोईर ( रा. दादरपाडा) यांच्या कडून कबुउद्दीन सरदार पटेल व खानमिया हैदर शेख यांनी दोन कंटेनर विकत घेऊन अभिजित सतिश घरत ( रा.जासई) यांना दोन रिकामे कंटेनर १लाख ६० हजार रुपयाला विकले असे तपासात निष्पन्न झाले.तपास अधिकारी ए पी आय कैलास गवते यांनी कंटेनर चोरी करणारा व कंटेनर विकत घेणारा अशा चार ही आरोपींना अटक केली.सदर आरोपींना उरण न्यायालयात हजर केले असता त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *