खोपोली : खोपोली शहरात आज दुर्दैवी घटना घडली, पावसाचा आनंद एका कुटुंबावर व मित्रपरिवारावर काळ बनून आला. झेनिथ धबधब्यावर मौजमजा करायला गेले असता अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने दोन महिलांसह एक आठ वर्षांची मुलगी वाहून गेली. घटनेची माहिती मिळताच अपघातग्रस्तानच्या मदतीला टीम तेथे धावली पाण्यात अडकलेल्या बारा जणांना त्यांनी सुरक्षित बाहेर काढले पण या तिघांना ते वाचवू शकले नाहीत.दोन महिलांचे शव अगदी एक किलोमीटर च्या अंतरावर वाहत जाताना मिळून आले पण आठ वर्षाच्या मुलीचा काही थांगपत्ता लागला नाही. अंधार पडल्याने शोधमोहीम थांबवण्यात आली व सकाळी उजाडताच पुन्हा शोधमोहीम सुरू होईल असे रेस्क्यू टीम कडून सांगण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार झेनिथ कंपनी जवळ असणाऱ्या विहारी गावातील खान व त्यांचे शेजारी यांच्याकडे पाहुणे आले होते. दुपारी जेवण झाल्यावर कुटुंबातील दोन पुरुष, पाच महिला व आठ लहान मुलं यांनी बाजूलाच असलेल्या झेनिथ धबधब्यावर पावसाचा आनंद घ्यायचा बेत आखला व ते सर्व दुपारी तीन-साडेतीन च्या दरम्यान धबधबा परिसरात गेले.गुलाब चक्रीवादळाने प्रशासनाने अतिवृष्टी चा इशारा प्रशासनाने दिला होता त्यानुसार दुपारी खोपोली शहरात व डोंगरमाथ्यावर तुफान पाऊस त्यावेळेस सुरू झाला. ही पंधराजण धबधब्याचा नाला पार करून पुढे धबधब्याकडे निघाली होती पण अचानक नाल्यातील पाण्याचा प्रवाह वाढला.पुढे काही गडबड व्हायला नको म्हणून सर्वानी माघारी फिरण्याचा निर्णय घेतला.धबधब्यावर पर्यटकांना बंदी असल्याने त्या परिसरात त्यांच्या मदतीला कोणी नव्हते.
दोन पुरुष व पाच महिला असे सात जण मध्यमवयीन होते पण त्यांच्याबरोबर तब्बल आठ लहान मूल होती म्हणून त्या सात जणांनी पाण्यातून एक चैन बनवून प्रथम सर्व मुलांना नाला पार करण्याचे ठरवले.व त्याप्रमाणे ते एक एक मुलाला बाहेर काढत असताना मेहरबानू खान यांनी त्यांची आठ वर्षांची भाची अलमा हिला कडेवर घेतले होते. प्रवाहाच्या मध्यावर आल्यावर मेहरबानू याचा पाय घसरला व अलमा त्याच्या हातून सटकली व पाण्यात पडली तेव्हा तिला वाचवण्यासाठी त्यांनी चैन सोडून तिच्या दिशेने स्वतःला पाण्यात झोकून दिले व तिला पकडायला शेजारी उभ्या असलेल्या तिची शेजारीण रुबिना वेळेकर ने तिला पकडण्याचा प्रयत्न केला असता तीही पाण्यात सटकली हे पाहून क्षणार्धात रुबिनाच्या नवऱ्याने त्यांना पकडले पण पाण्याचा प्रवाह इतका जोरात होता की त्याच्या एकट्याने त्या तिघी आवरत नव्हत्या. त्याच वेळेस नाल्याबाहेर उभा असलेल्या रुबिनाच्या लहान मुलाने आपली आई वाहत जाते हे पाहून नाल्यात उडी घेतली. त्याला ही रुबिनाच्या नवऱ्याने एक हाताने पकडले पण त्याचे श्रम कमी पडले व या तिघी त्याच्या हातून निसटल्या.
त्याने खूप आरडाओरडा केला पण तेथे कोणीही नव्हते.शेवटी त्याने दूरध्वनी द्वारे जवळच्या लोकांना संपर्क केला तशी ही घटना वाऱ्यासारखी खोपोली शहरात पसरली.अपघातग्रस्तानच्या मदतीला या टीम ही खबर लागताच सर्व कामे टाकून गुरुनाथ साठीलकर, अझीम करजीकर, अमोल कदम, भक्ती साठीलकर, रविंद्र रोकडे यांनी झेनिथ परिसर गाठला. बाकीची टीम ही तेथे हजर झाली एका टीम ने अडकलेल्या बारा जणांना सुरक्षित प्रवाहाच्या बाहेर काढले तर दुसरी टीम वाहून गेलेल्या तिघींचा शोध घेत होती. अगदी तासाभरातच घटनास्थळा पासून एक किलोमीटर अंतराच्या आत मेहरबानू व रुबीनाचे मृतदेह पाण्यात वाहून जात असताना मिळून आले, पण छोटी अलमा काही मिळून आली नाही. रात्री अंधार पडे पर्यंत पाताळगंगा नदीच्या पात्रात तिचा शोध घेतला गेला पण अपघातच्या टीम ला यश आले नाही. शेवटी उद्या पहाटे पुन्हा शोधमोहीम सुरू करण्याचे ठरवून टीमने शोधमोहीम थांबवली.
Leave a Reply