उरण दि 27(राघवी ममताबादे )उरण तालुक्यातील जसखार गावातील महिला दिपाली घरत हिला तिच्या पतीच्या मृत्यू नंतर नोकरीची गरज असताना Fassai lab चे renovation चालू असताना हाऊस किपिंग म्हणून तात्पुरत्या स्वरूपात तिथे काम मिळाले .FASSAI ही लॅब उरण तालुक्यातील जसखार गावच्या हद्दीत असून ज्यावेळेस त्या लॅब चे काम पूर्ण झाले,त्यानंतर लगेच दिपाली घरत हिला तिथल्या अधिकाऱ्यांनी नोकरीवरून काढून टाकले.त्यावेळेस कुठल्याही क्षणाचा विलंब न करता जनविकास महिला संस्थेच्या अध्यक्ष कविता ठाकूर आणि सदस्य त्वरित Fassai लॅब मधे जावून लॅब च्या इन्चार्ज धनिया मॅडम सोबत चर्चा करून दीपाली यांना कामावर घेण्याची मागणी केली.
महिला संस्थेच्या विनंतीला मान देवून एका आठवड्यात कामावर घेतो असे लॅबच्या धनिया मॅडम कडून सांगण्यात आले.आठवड्या नंतर दिपाली घरत हिला कामावर रूजू केल्यानंतर दोन महिन्यात पून्हा दिपाली घरत हिला तिथल्या अधिकाऱ्यांनी नोकरीवरून काढून टाकले.हे कृत्य दिपाली घरत हिने महिला संस्थेच्या निदर्शनास आणले त्यानंतर महिला संस्थेच्या अध्यक्ष आणि सदस्यांनी जनविकास महिला संस्थेचे सल्लागार कामगार नेते तथा जे एन पी टी विश्वस्त भूषण पाटील आणि कामगार नेते सुरेश पाटील यांची भेट घेऊन सदर समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिली.जनविकास महिला संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी FSSAI च्या अधिकाऱ्यांना घेराव घातला. तसेच भुषण पाटील यांनी प्रकल्पग्रस्त कामगार कायदेविषयक चांगलेच ज्ञान देऊन तिथल्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. ह्याचा परिणाम म्हणजे FASSAI च्या अधिकाऱ्यांनी दिपाली घरत यांना ताबडतोब कामावर घेतले.आणि कायमस्वरूपी नोकरीत समावेश करण्याचे मान्य केले. या सर्वांच्या प्रयत्नाला यश आले असून एका गरीब महिलेला न्याय मिळाल्याने दीपाली घरत हिला मदत करणाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.पतीच्या निधनानंतर दोन मुले असलेल्या दीपाली घरतने नोकरी करत आपला संसार सांभाळला. मात्र मध्येच नोकरी वरून काढून टाकल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. घरात कमावता, कर्ता पुरुष कोणीच नसल्याने त्या चिंताग्रस्त झाल्या होत्या मात्र सर्वांच्या मदतीने त्यांना परत कामावर घेतल्याने त्यांनी समाधान व्यक्त करत सर्वांचे आभार मानले आहे.
Leave a Reply